शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

आम्ही सांभाळतो मोर्चा; तुम्ही सांभाळा गाव!

By admin | Updated: September 26, 2016 23:40 IST

रिकाम्या गावांमध्ये दिवसा गस्त : अनुचित प्रकार टाळण्यासाठी ग्रामपंचायत, पोलिस पाटील, पोलिस मित्रांचा घेणार मदत

वाठार स्टेशन : भावी पिढीच्या हितासाठी कित्येक पिढ्यांनंतर मराठा बांधव एकवटत आहे. सातारा महामोर्चाच्या बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांवर येऊन पडली आहे. गावचे गाव सहभागी होणार असल्याने त्या दिवशी गावांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ‘आम्ही मोर्चा सांभाळतो.. तुम्ही गाव सांभाळा,’ असे आवाहन पोलिस ग्रामस्थांना करत आहेत. त्यादृष्टीने गावात पोलिस पाटील तसेच पोलिस मित्रांचा वापर केला जाणार आहे.मराठ्यांची राजधानी म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. त्यामुळे साताऱ्यातील मोर्चाही ‘न भूतो, न भविष्यती’ असा महामोर्चा निघायला हवा. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चास मिळालेला प्रतिसाद पाहता साताऱ्यातील महामोर्चा इतिहास घडवेल, याची खात्री व्यक्त केली जात आहे. महामोर्चाच्या अनुषंगाने तालुका, गाव, वाड्या-वस्त्यांवर नियोजन बैठका होत आहेत. महामोर्चात गावचे गाव सहभागी होणार असल्याने त्या दिवशी गावे रिकामी होणार आहेत. यामुळे गावांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा राहणार आहे. महामोर्चासाठी गावातील सर्वच तरुण, ग्रामस्थ साताऱ्याकडे जातील, त्यावेळी गावात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आता या गावात दिवसा गस्त घालावी लागणार आहे. यासाठी गावातील ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस मित्र, पोलिस पाटील यांच्याकडे आता ही जबाबदारी देण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी लवकरच पोलिस ठाण्यात बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत पोलिसांकडून या लोकांना या दिवशी च्या नियोजनच्या सूचना दिल्या जाणार आहेत.सातारा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकजण कामाला लागला आहे. गाव बैठकाबरोबरच वहातूक व्यवस्था, वाहतूक मार्ग, प्रवासाची वेळ, नाष्टा याबाबतचेही नियोजन सर्वच ठिकाणी सुरू आहे. पोलिस मात्र लोकांच्या सुरक्षेसाठीच्या नियोजनात व्यस्त आहेत. त्यामुळे या काळात सुरक्षेचा भार पोलिस पाटील, पोलिस मित्रांवर येणार आहे. (वार्ताहर)साताऱ्यातील सोमवार, दि. ३ रोजी महामोर्चा निघणार आहे. यादिवशी मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलिस जाणार आहेत. गावचे गाव ओस पडणार असल्याने पोलिसाशिवाय गावाच्या संरक्षणाची जबाबदारी ग्रामस्थांची राहणार आहे. यावेळी गावातील पोलिस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस मित्र यांच्या सहकार्याने गावची सुरक्षा यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच वाठार पोलिस ठाण्यात या सर्वांची बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीत गावाच्या सुरक्षेवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच जबाबदारी सोपवणार आहोत. महामोर्चात जे लोक सहभागी होणार आहेत, यामध्ये शक्यतो लहान मुलांचा व ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होऊ नये. - शहाजी निकम,सहायक पोलिस निरीक्षक, वाठार पोलिस स्टेशनआठ-दहा किलोमीटर लागणार चालावेमहामोर्चात सहभागी होणाऱ्यामध्ये प्रत्येकाला किमाण आठ ते दहा किलोमीटर चालत जाऊन शहरात जावे लागणार आहे. गर्दीतून चालावे लागणार असल्याने या दरम्यान कोणालाही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. महामोर्चातील गर्दी पाहता महामोर्चात लहान मुलं, वयोवृद्धांचा समावेश नसावा, अशा सूचनाही पोलिस यंत्रणेकडून गावोगावच्या बैठकांमध्ये केल्या जात आहेत. पोलिस ठाणेही होणार रिकामेमराठा महामोर्चा ‘रेकॉर्ड ब्रेक’ करण्यासाठी तरुणाई धडपडत असताना या महामोर्चाची सर्वात मोठी जबाबदारी पोलिसांवर राहणार आहे. महामोर्चासाठीच्या अनेक मार्गांबाबत लोकांना माहिती देण्याबरोबरच कोंडी होऊ नये, याची जबाबदारी पोलिसांची राहणार आहे. अशावेळी ग्रामीण भागातील पोलिस ठाणे पोलिसाविना रिकामी पडणार आहेत. याचा गैरफायदा कोणी घेऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.