शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही सारे दाभोलकर...! नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन : अंनिस, परिवर्तनवादी समन्वय समितीतर्फे कृतिशील अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:45 IST

डॉ. नरेंद्र दाभोेलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व परिवर्तनवादी समन्वय समितीतर्फे त्यांना कृतिशील अभिवादन करण्यात आले. शाहूनगरीत सोमवारी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर घुमला.

सातारा : डॉ. नरेंद्र दाभोेलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व परिवर्तनवादी समन्वय समितीतर्फे त्यांना कृतिशील अभिवादन करण्यात आले. शाहूनगरीत सोमवारी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर घुमला.

सातारा शहरात विविध ठिकाणी सोमवारी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शाहू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत महाविद्यालयीन युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.येथील जिजामाता अध्यापिका विद्यालयात वैज्ञानिक मनोभावांची रुजवणूक कार्यशाळा घेण्यात आली. सकाळी साडेअकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही कार्यशाळा झाली. ‘अंनिस’चे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार यांनी ‘जादूटोणाविरोधी कायदा इतिहास’ याविषयी मार्गदर्शन केले. हा कायदा झाल्यापासून ४५० गुन्हे दाखल झाले. जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत काय-काय करता येईल, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. व्यसनमुक्तीच्या सत्रात परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे उदय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा’ या विषयावर प्रा. प्रमोदिनी मंडपे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या भाषणाची चित्रफीत दाखविण्यात आली. क्रांतिस्मृती अध्यापक विद्यालय, महात्मा फुले अध्यापक विद्यालय, जिजामाता अध्यापिका विद्यालयाचे १२५ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

सायंकाळी गोलबागेसमोर अंनिस व परिवर्तनवादी समन्वय समितीतर्फे पोस्टर प्रदर्शनाद्वारे डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अभिवादन करण्यात आले. मानसिक आरोग्यावर येथे पोस्टर प्रदर्शन आयोजित केले होते. सायंकाळी पाठक हॉलमध्ये जयदेव डोळे यांचे व्याख्यान झाले.ठरलं डोळस व्हायचं...!डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेले ‘ठरलं डोळस व्हायचं’ या पुस्तकातील विविध संदर्भ वक्त्यांनी दिले. या पुस्तकामध्ये बुवाबाजीवर डॉ. दाभोलकर यांनी ओढलेले आसूड याविषयीही माहिती देण्यात आली.साताऱ्यातील राजवाडा परिसरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी फलक हातात घेऊन निदर्शने केली. ‘आम्ही सारे दाभोलकर’च्या घोषणा दिल्या.