शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

उरमोडीतून पाण्याचा विसर्ग, कोयनेचा विसर्ग ५५ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 12:44 IST

पश्चिम भागात सोमवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सोमवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात प्रथमच उरमोडी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. तर कोयना धरणाचे दरवाजे पाच फुटांपर्यंत वाढविण्यात आले असून, दुपारनंतर आणखी विसर्ग वाढणार आहे. त्यामुळे ५५ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग होणार आहे. 

जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत अनेक दिवस पाऊस पडला. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. आता काही दिवसांच्या अल्प हजेरीनंतर पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला आहे. पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील असणारी प्रमुख धरणे भरली आहेत. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण परिसरात ९५ मिलीमीटर पाऊस झाला.धरणात १०२.७६ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी सकाळपासून धरणाचे दरवाजे पाच फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत. सहा दरवाजांतून व पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तरीही पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी दोनपासून पाण्याचा विसर्ग ५५ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. तर उरमोडी धरणातून यावर्षीच्या पावसाळ्यात प्रथमच पाणी सोडण्यात येणार आहे. धरणात ९.७८ टीएमसी पाणीसाठा असून, एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. धरण ९८.११ टक्के इतके भरले आहे.  

बुधवारी सकाळपर्यंत धोम धरणात १२.७२ टीएमसी पाणीसाठा होता. तर कण्हेरमध्ये ९.४४, बलकवडी ३.९८ तर तारळी धरणात ५.५९ टीएमसी साठा होता. तारळी धरणातून पुन्हा पाणी सोडणे सुरू झाले आहे. तर धोम धरणातून ३२२४, कण्हेर २८०६, बलकवडी धरणातून २२७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  

धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये  

धोम         ०८                    ५७२

कोयना     ९५             ४७८५

बलकवडी  ६२          २३९५

कण्हेर         १०           ६५७

उरमोडी       ३५           १०९६

तारळी        ३४            २००३ 

टॅग्स :Koyana Damकोयना धरण