शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मनसंधारणामुळे गावांना मिळालं नवरूप - वॉटर कप स्पर्धा : चला गाव बदलूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:04 IST

दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच टँकरचे पाणी डोक्यावरून घागर घेऊन जाणारे पुरुष आणि कमरेवरून हंडा घेऊन पाणी भरणाऱ्या महिला यंदा पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षण केंद्रावर सहभागी झाल्या

ठळक मुद्देपाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षण केंद्रावर आलेल्या ग्रामस्थांचा वाढला उत्साह-

सातारा : दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच टँकरचे पाणी डोक्यावरून घागर घेऊन जाणारे पुरुष आणि कमरेवरून हंडा घेऊन पाणी भरणाऱ्या महिला यंदा पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षण केंद्रावर सहभागी झाल्या आहेत. जलसंधारणाचे विज्ञान शिकल्यानंतर वॉटर कप स्पर्धेत काम करण्याचा त्यांचा उत्साह दुपटीने वाढला आहे.

पाणी फाउंडेशनच्या चौथ्या टप्प्याला ८ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. गेल्या तीन वर्षांत वॉटर कप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना चांगले यश मिळाले आहे. त्यामध्ये वेळू, अनपटवाडी, टाकेवाडी, भांडवली या गावांमध्ये केलेल्या जलसंधारणाच्या कामांची राज्यभरात दखल घेतली गेली. यंदा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सुमारे सात हजार गावांनी सहभाग नोंदवला असून, सातारा जिल्ह्यातील २८८ गावांमध्ये स्पर्धेचं तुफान आलं आहे. यंदा स्पर्धेत माण तालुक्यातील ८२, कोरेगावमधील ८१ व खटावमधील १२० गावांचा समावेश आहे.

स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमधील प्रत्येकी पाच व्यक्तींसाठी प्रशिक्षणांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या प्रशिक्षणासाठी कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी, हिवरे, माण तालुक्यातील भांडवली, खटाव तालुक्यातील भोसरे व कटगुण आदी गावांमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी दुष्काळी भागातील टंचाईग्रस्त गावांमधील शाळकरी मुलांसह, युवक, महिला आणि वृद्धांचा समावेश आहे.

पाणी फाउंडेशनच्या समन्वयकांकडून गावांमध्ये करावयाच्या कामांची तांत्रिक माहिती घेऊन जलसंधारणाचे बारकावे शिकून घेण्याचा प्रयत्न घेत आहे. आतापर्यंत साधारण एक हजार पुरुष, महिलांनी सहभाग नोंदवला आहे. प्रशिक्षण घेतल्याने त्यांचा उत्साह वाढला असून, गावात जाऊन इतर ग्रामस्थांनाही ते जलसंधारणाचं तंत्र समजावून सांगत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचे मनसंधारण होत असून, गावाला नवरूप आलं आहे. गावांमध्ये आतापासून सुरुवात झाली आहे. 

दुष्काळग्रस्त भागातील अनेक गावे सुरुवातीला प्रशिक्षणास येत नव्हती. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून त्यांना विविध जलसंधारणाच्या कामांची माहिती देण्यात आली. हसत-खेळत जलसंधारणाचे विज्ञान शिकताना त्यांची धमाल शाळा भरली आहे. प्रशिक्षण पूर्ण करून गावी परतलेल्या अनेक गावांमध्ये शोषखड्डे, सांडपाणी व्यवस्थाबाबत काम सुरू झाले आहे.-बाळासाहेब शिंदे,जिल्हा समन्वयक, पाणी फाउंडेशन 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई