शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतील पाणीसाठ्याचे काउंटडाऊन सुरू

By admin | Updated: April 23, 2017 22:41 IST

४० दिवस ३१ टीएमसी : चिंता आणखीनच गडद होणार; धरणातील पाण्याचे नियोजन होणार का?

पाटण : देशातील वीजनिर्मितीच्या प्रमुख स्त्रोतापैकी एक असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्याचे सध्या झपाट्याने काउंटडाऊन सुरू असून, सध्या धरणात ३१.९२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कडक उन्हाळ्यात वीजनिर्मिती आणि पूर्वेकडील सांगलीपर्यंतच्या गावांना सिंचनासाठी होणाऱ्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच कोयना धरणातील दोन टीएमसी पाणी कर्नाटकला दिले. त्यामुळे जूनचा पाऊस पडेपर्यंत कोयना धरणातील पाणी पुरणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमतेचा कोयना जलाशय आहे. यावर्षी पावसाळ्यात जवळपास पूर्ण भरलेला. त्यामुळे वर्षभराची गरज भागणार, अशी खात्री होती. तरीसुद्धा एप्रिल, मे आणि जून अखेरचे दिवस कोयना धरणातील पाण्यावर भागणार का?, अशी चिंता आताच लागून आहे. १ जूनपासून आतापर्यंत कोयना धरणातून वीजनिर्मितीसाठी ६० टीएमसी आणि सिंचनासाठी २१ टीएमसी पाणीसाठा खर्च झाला आहे. ६ टीएमसी पाणीसाठा उन्हामुळे बाष्पीभवन होऊन वाया गेला आहे. त्यातच कोयना धरणातील पाणी कर्नाटक राज्याला देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर २ टीएमसी पाणी कोयना धरणातून देण्यात आले म्हणूनच येत्या ४० दिवसांसाठी ३१ टीएमसी पाणी कसे पुरणार त्याचे नियोजन होणार आहे का? आणि कोयना धरणातील पाणी कर्नाटक किंवा इतर राज्यांना सोडण्याची मागणी पुन्हा झाली तर पाणी साठ्याची चिंता आणखीनच गडद होणार, हे मात्र निश्चित. (प्रतिनिधी)आमदारांचा विरोध डावलला...कोयना धरणातून कर्नाटकला पाणी देऊ नये, असा ठराव जिल्ह्यातील सर्व आमदारांनी करूनही पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कोयनेतील पाणी न देण्याची विनंती केली केली आहे.