शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेत १०४ टीएमसीवर पाणीसाठा, आवक कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 18:12 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असल्याने प्रमुख धरणांत कमी प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत कोयनेला २, महाबळेश्वर ४ आणि नावजला ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणातील पाणीसाठा १०४.१७ टीएमसी झाला होता.

ठळक मुद्देकोयनेत १०४ टीएमसीवर पाणीसाठा, आवक कमीच महाबळेश्वर ४ तर नवजाला ८ मिलिमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असल्याने प्रमुख धरणांत कमी प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत कोयनेला २, महाबळेश्वर ४ आणि नावजला ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणातील पाणीसाठा १०४.१७ टीएमसी झाला होता.जिल्ह्याच्या अनेक भागात मागील रविवारी दमदार पाऊस झाला होता. यामध्ये ऊस, बाजरी, सोयाबीनसह भुईमुगाचे अधिक नुकसान झाले. यामुळे शेतकरी कोलमडला. त्यानंतर मात्र, पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

पश्चिम भागात तुरळक स्वरूपात पाऊस होत आहे. तर पूर्व भागात गेल्या काही दिवसांत पाऊस झाला नाही. सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत कोयनेला अवघा २ मिलिमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ४२३९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

महाबळेश्वरला ४ आणि यावर्षी आतापर्यंत ४८५१ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तर नवजा येथे जूनपासून ४८५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०४.१७ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून कोयना धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. दरम्यान, साताऱ्यात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर सोमवारी ढगाळ वातावरनाबरोबरच दुपारी सूर्यदर्शन झाले.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर