शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पुसेगाव औद्योगिक वसाहतीसाठी पाणी आरक्षित

By admin | Updated: June 6, 2014 00:02 IST

शशिकांत शिंदे : कण्हेर धरणातील पाणी पुसेगाव औद्योगिक क्षेत्राला

कोरेगाव : पुसेगावसह परिसरातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत मंजूर आहे. मात्र, प्रकल्पाचे काम आवश्यक तेवढ्या गतीने होत नव्हते. या भागाच्या विकासाठी हा प्रकल्प होणे गरजेचे आहे, त्यासाठी संबंधित मंत्री व अधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या. म्हणूनच या प्रकल्पासाठी कण्हेर धरणातून १६ दशलक्ष घनमीटर इतके पाणी आरक्षणाच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी दिली.जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या योजनेसाठी मंजूर निधीस मान्यता मिळाल्यामुळे पहिला टप्पा (नेर तलाव) तातडीने मार्गी लागेल आणि शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. युवकांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी पुसेगाव औद्योगिक वसाहतीसंदर्भातील औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याच्याबाबतच्या सूचना दिल्या.त्यानुसार संबंधितांनी हा प्रस्ताव १ आॅक्टोबर २०१३ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई यांना सादर केला असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)