शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय ‘ठिणग्यां’वर फिरतंय पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:40 IST

कलेढोण परिसरात पाणलोट व पाणी फाउंडेशन अंतर्गत कामे सुरू आहेत. जलसंधारण कामाच्या निमित्ताने राजकीय गटबाजीचे दर्शन होत आहे. गटातटाचे राजकारण, अस्तित्व व श्रेयवादापोटी अधूनमधून राजकीय ठिणग्या पडत आहेत.

ठळक मुद्देकलेढोणमध्ये श्रेयवादासाठी शह-काटशह : विकासकामांत नको राजकारण, महिलांची एकजूट

संजय जगताप ।कलेढोण : कलेढोण परिसरात पाणलोट व पाणी फाउंडेशन अंतर्गत कामे सुरू आहेत. जलसंधारण कामाच्या निमित्ताने राजकीय गटबाजीचे दर्शन होत आहे. गटातटाचे राजकारण, अस्तित्व व श्रेयवादापोटी अधूनमधून राजकीय ठिणग्या पडत आहेत. मात्र, महिलांच्या एकजुटीमुळे त्यावर चाप बसत आहे. चांगल्या कार्यात कोणीही राजकारण आणू नये, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

कलेढोणला पाणलोट विकास व पाणी फाउंडेशनअंतर्गत जलंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, त्यासाठी सारा गाव एकवटला आहे. अधिकाधिक कामे पूर्ण करून गावाच्या कपाळी लागलेला दुष्काळाचा टिळा कायमचा पुसण्यासाठी सर्वांनी वज्रमूठ आवळली आहे. मात्र, ती कामे करत असताना आघाडीवरील स्थानिक नेते, कार्यकर्ते कळीचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. कुरघोड्यांचे राजकारण सुरू होत आहे. राजकीय अस्तित्व व श्रेयवाद उफाळून येत आहे, त्यामुळे शह-काटशहांचे राजकारण सुरू होत आहे. त्याचा एकंदरीत दुष्परिणाम गावांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांवर होत आहे.

मनमानी, हटवादीपणा, इतरांना विश्वासात न घेण्याची मनोवृत्ती यामुळे एकमेकांची मने दुखावली जात आहेत. माझ्यामुळेच सर्वकाही सुरू आहे, असे भासवण्याचा प्रयत्न करीत स्थानिक नेते व कार्यकर्ते इतरांना कमी लेखत आहेत. परिणामी नाराजी व्यक्त करीत काहीजण विकासकामाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे कामांवर विपरित परिणाम होत आहे. मात्र, नेते आणि कार्यकर्त्यांच्या त्या स्वार्थी, श्रेयवादी वागण्याला महिलांकडून चाप बसत आहे. महिलांनी गटतट, राजकीय स्वार्थ, श्रेयवाद यासह सर्व प्रकारच्या भेदांच्या भिंती पार करीत पाणी फाउंडेशनच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे.वाड्यावस्त्यांवर महिलांच्या बैठकागावासह वाड्या-वस्त्यांवर गाठीभेटी होत आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत बैठका घेत आहेत. महिला भगिनींचे समुपदेशन करीत आहेत. पाणी फाउंडेशनच्या लोक चळवळीत उडी मारण्याचे आवाहन करीत आहेत. त्याचा परिणाम म्हणून दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी महिलांनी कंबर कसली आहे. पाणी फाउंडेशनच्या कामांत श्रमदान, अन्नदान करण्यासाठी त्या पुढे येत आहेत. 

राजकीय नेते, कार्यकर्ते निष्प्रभयांत्रिक कामांसाठी लागणाऱ्या इंधनासाठी खारीचा वाटा म्हणून आर्थिक बोजा उचलत आहेत. महिलांची एकी झाल्यामुळे पाणी फाउंडेशनच्या कामाला वेग आला आहे. पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर एक पाऊल पुढे टाकत महिला कामाला लागल्या आहेत. महिलांच्या एकजुटीपुढे राजकीय नेते व कार्यकर्ते निष्प्रभ ठरत आहेत. तरीही, गटातटाचे राजकारण न करता सर्वांनी एकीची वज्रमूठ आवळून गावाच्या विकासकार्यात हातभार लावावा. चांगल्या कामात अकारण राजकारण आणू नये, अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.कलेढोण येथे पाणी फाउंडेशनअंतर्गत जलंसधारणाच्या कामाबाबत परिसरातील स्थानिक महिला एकवटल्या.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर