शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

कोयना धरणाच्या दरवाजाला टेकले पाणी

By admin | Updated: August 1, 2014 23:22 IST

७१ टीएमसी पाणी : तारळी, कण्हेर, बलकवडी, वीर, उरमोडीतून विसर्ग

पाटण : सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी कोयना धरण पोणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणात ७१.८५ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरणाच्या दरवाजांना पाणी टेकले आहे.कोयना धरणातील पाणीपातळी २१३२ फूट झाली आहे. त्यामुळे धरणाच्या भिंतीतील सहा वक्री दरवाजांना पाणी टेकले आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत कोयना येथे १३२, नवजा येथे १८५ तर महाबळेश्वरमध्ये १४५ मिलीमीटर पाऊस पडला. कोयना धरण भरण्यासाठी आणखी ३४ टीएमसी पाण्याची गरज आहे. शुक्रवारी पावसाचा जोर मंदावला असला तरी धरणात ७१,७०८ क्युसेक पाणी येत आहे. १ जूनपासून कोयना येथे ३,१५३, नवजा येथे ३,७४८, तर महाबळेश्वरमध्ये २,९६३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. संगमनगर धक्का पुलाचे पाणी कमी झाले असल्याने पुलापलीकडील ३५ गावे संपर्कात आली आहेत. कोयनेत ८५ टीएमसी पाणीसाठा झाला की धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन केले जाते. त्यानंतर कधी व किती पाणी धरणाच्या दरवाजातून सोडायचे हे ठरविले जाते. सातारा शहरातही गेल्या चार दिवसांत मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. मात्र, शुक्रवारी काही काळ विश्रांती घेतली. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेली कामे सातारकरांनी पूर्ण केली. सततच्या पावसामुळे शेतीचे काम भर पावसात सुरू होती. आज उघडीप दिल्याने गवत व पिके उगवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे चाराचा प्रश्न सुटणार आहे. (प्रतिनिधी)