शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या वर्गणीतून ओढ्यात जलवाहिन्या

By admin | Updated: March 30, 2017 23:31 IST

गाळ काढण्यास प्रारंभ : सात वर्षांनंतर खळाळणार आदर्कीचा ओढा

आदर्की : आदर्की-हिंगणगाव बारमाही वाहणारा ओढा धोम-बलकवडी कालव्याच्या कामामुळे सात वर्षांपासून कोरडा पडत होता. त्यामुळे आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, हिंगणगावात पाणीटंचाई होऊन शेतकरी वर्गाच्या विहिरी कोरड्या पडत होत्या. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी खोदकामासाठी मशीन उपलब्ध करून दिली. सिमेंट पाईप टाकण्यासाठी लोकवर्गणी तर पाईप टाकून मुजवण्यासाठी शरयू फाउंडेशनने मशीन दिल्याने आदर्की-हिंगणगाव ओढा सात वर्षांनी खळाळणार आहे.फलटण-कोरेगाव तालुक्याच्या सीमेवरून हजारो हेक्टर डोंगर परिसरातून आदर्कीच्या ओढ्याला पावसाचे पाणी वाहून येत होते. त्यामुळे आदर्कीचा ओढा बारमाही वाहत होता. सात वर्षांपूर्वी आदर्की खुर्द परिसरात धोम-बलकवडी कालव्याचे खोदकाम सुरू झाले. त्यावेळी जमिनीपासून ३० ते ४० फूट खोल कालवा गेल्याने ओढ्याचे पाणी व नैसर्गिक स्त्रोत तुटल्याने ओढा कोरडा पडू लागला. त्यामुळे आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, हिंगणगाव परिसरात पाणी टंचाई भासत होती.आदर्की खुर्द गावाला कालवा वळसा घालून भरून वाहिला तरी ओढा मात्र कोरडाच राहत होता.ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी ओढा व कालवा याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन खुदाईसाठी स्वत: मशीन उपलब्ध करून दिले तर आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक येथील अंदाजे ८० शेतकऱ्यांनी लोकवर्गणी, तरुण मंडळांनी पुढाकार घेऊन ४५ सिमेंट पाईप जमिनीत गाडून ओढा-कालवा असे दारे काढून दिले. चारीत पाईप गाडण्यासाठी मशीन उपलब्ध करून दिल्यामुळे काम पूर्ण झाले आहे.