शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात पाणी; शेतकरी समाधानी..!

By admin | Updated: April 26, 2017 13:26 IST

खंडाळा तालुका ; धोम बलकवडीचे पाणी खळाळू लागले; प्रशासनावरील ताण कमी

आॅनलाईन लोकमतखंडाळा (जि. सातारा), दि. २६ : खंडाळा तालुक्यात उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर धोम-बलकवडी कालव्याचे पाणी भरभरून वाहू लागल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर धोम बलकवडीच्या पाण्याने तालुका टँकरमुक्त झाला आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताण सुध्दा कमी झाला आहे.खंडाळा तालुक्याच्या माथ्यावरील दुष्काळी टिळा कायमस्वरुपी पुसून धोम बलकवडी प्रकल्प तालुक्यासाठी वरदान ठरलेला आहे. या कालव्यामुळे जवळपास अर्ध्या तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेती पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. या कालव्यातून उन्हाळ्यात किमान दोन आवर्तने सोडण्यात यावीत अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांची होती. खंडाळा तालुक्यातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागल्याने आमदार मकरंद पाटील यांनी धोम बालकवडी प्रकल्पाच्या प्रशासनाला सूचना करून पाणी सोडण्यास सांगितले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही माळरानातून पाणी खळाळताना दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी पाणी सुटल्याने या कॅनॉलच्या लाभक्षेत्रातील असवली पासून ते कोपर्डेपर्यंतच्या अठरा गावात शेती सिंचनाची समस्या मिटली आहे. या भागातील सर्व बंधारे, विहिरी, पाझर तलाव तुडूंब भरले जात असल्याने ह्यपाणीच पाणी चहुकडेह्ण अशी स्थिती पहायला मिळत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांसाठी होणार आहे.सध्या तालुक्यात यात्रांचा हंगाम चालू आहे. या काळात लागणाऱ्या अतिरिक्त पाण्याची निकडही भागणार आहे. तसेच या भागातील सर्व पाण्याचे साठे भरल्यास पुढील दोन महिने पाण्याची कोणतीच समस्या उरणार नाही.टँकरमुक्तीला चालना...दरवर्षी उन्हाळ्यात दोन महिने तालुक्यात काही गावांना पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु करावा लागत होता. पण धोम बलकवडीचे पाणी आल्याने तालुक्यात टँकरमुक्ती करणे शक्य झाले आहे. तसेच लाभक्षेत्राबाहेरील गावांनाही ओढ्यातून पाणी जात असल्याने त्यांचाही प्रश्न मार्गी लागला आहे.फळबागांना जीवदानखंडाळा तालुक्यात कांदा, ऊस यांसारख्या नगदी पिकांसोबत फळबागांची लागवड अनेक ठिकाणी केली आहे. या पाण्यामुळे सिंचनासाठी तयार केलेले शेततळे भरून घेता येणार आहे. त्याच पाण्याचा वापर करून उन्हाळ्यात फळबागांना जीवदान देणे शक्य होणार आहे. खंडाळा तालुक्यातील जनतेची धोम बलकवडीचे पाणी सोडण्याबाबत सातत्याने मागणी होती. उन्हाळ्यात पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांचा अधिकचा फायदा होणार आहे. नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी मोर्वे गावापर्यंत पोहचू शकले आहे. यापुढचे कामही जलद गतीने पूर्ण करून आठवड्यात पाणी वाघोशीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न राहणार आहे . - मकरंद पाटील, आमदार