शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

पाणी आटले अन् जुने धरण दिसले..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:26 IST

खंडाळा : सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वीर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे ब्रिटिशांनी बांधलेले जुने धरण दिसू लागले ...

खंडाळा : सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वीर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे ब्रिटिशांनी बांधलेले जुने धरण दिसू लागले आहे. गेले अनेक वर्षे धरणाच्या पाण्यात राहूनही जुने धरण आजही चांगल्या स्थितीत आहे. सात वर्षांनतर पुन्हा वर आलेल्या हे जुने धरण पाहण्यासाठी नागरिक या ठिकणी गर्दी करत आहेत.वीर धरणाची निर्मिती १९२० ते १९२७ मध्ये करण्यात आली होती. याच दरम्यानच्या काळात भाटघर धरण बांधण्यात आले. १९१३ मध्ये भाटघर धरण बांधण्यास सुरुवात करण्यात आली. १९२८ मध्ये हे धरण पूर्ण करण्यात आले. वीर धरणाची क्षमता कमी असल्याने या धरणावर नवीन वीर धरण बांधण्याची संकल्पना पुढे आली. नवीन वीर धरणाचे बांधकाम १९६२ मध्ये सुरू करण्यात आले. १९६४ मध्ये हे धरण पूर्ण झाले. १९६७ मध्ये या धरणातून कालव्याद्वारे पहिले आवर्तन सोडण्यात आले. या धरणाच्या बांधकाम विषयावर परिसरातील अनेक जुन्या, ज्येष्ठ नागरिकांनी मजुरी केली असल्याचे सांगतात.नीरा नदीवर १९९६ मध्ये नीरा-देवघर धरण बांधण्यास सुरुवात करून २००७ मध्ये देवघर धरण पूर्ण करण्यात आले.१९६२ मध्ये या धरणावर नवीन वीर धरण बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. १९६४ मध्ये हे धरण पूर्ण करून १९६७ रोजी धरणातून पहिले आवर्तन कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. यावर्षी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने जुन्या धरणाचे अवशेष पाहायला मिळत आहेत. सुमारे ९२ वर्षांपूर्वीचे हे बांधकाम आजही जसेच्या तसे असल्याने ब्रिटिशकालीन बांधकामाची गुणवत्ता लक्षात येत आहे.ब्रिटिशकालीन अवशेष आजही सुस्थितीतजुने वीर धरण पाहताना पाणी अडविण्यासाठी धरणाचा घालण्यात आलेला बांध, धरणाचे दरवाजे, जुने जॅकवेल, जुने पॉवर हाऊस, धरणाचा डावा व उजवा कालव्याद्वारे करण्यात येणारी पाण्याची वितरण व्यवस्था, धरणावर व कालव्यावर जाण्यासाठीचे साकव पूल, कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा व्यवस्था आदी ब्रिटिशकालीन धरणाचे अवशेष आजही सुस्थितीत आहेत.