शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

दुष्काळी माणची वाटचाल टंचाईमुक्तीकडे...

By admin | Updated: December 28, 2015 00:58 IST

शिवारे झाली जलयुक्त : शासकीय योजनांचा लाभ घेऊन श्रमदानातून होतोय कायापालट--पाणीटंचाई : भाग चार

नवनाथ जगदाळे-दहिवडी  -कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा माण तालुका टंचाईमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. तालुक्याला संजीवनी ठरणाऱ्या उरमोडी, जिहे-कटापूर योजना पूर्णत्वाकडे जात आहेत. उरमोडी योजना नव्वद टक्के पूर्ण आहे तर जिहे-कटापूरसाठीही निधी उपलब्ध झाला असल्याने या योजना पूर्णत्वास जातील अशी अपेक्षा आहे.माण तालुक्यातील मोजकी गावे सोडली तर १०६ पैकी ९० गावांना दुष्काळात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पाणलोटच्या माध्यमातून माणला १३० कोटींचा निधी दिला. एकात्मिक पाणलोट विकासाच्या माध्यमातून १०६ पैकी ५१ गावांची निवड केली, तर उर्वरित ३१ गावे नव्याने समाविष्ट केली. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून व लोकसहभागातून तब्बल ११ कोटी ५० लाखांची कामे झाली. आतापर्यंत लहानमोठे ३०० ते ३२५ बंधारे तयार झाले. पाच ते साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर नाला बांध आणि दोनशे ते अडीचशे हेक्टर क्षेत्रावर खोलीकरण समानचर काढले. २५ ठिकाणी कृषी विभागाच्या आणि लोकसहभागातून ३६ बंधारे आता प्रस्तावित आहेत. नव्यानेच १८ बंधाऱ्यांसाठी ५ कोटी ५३ लाख मंजूर झाले आहेत. ४५ ठिकाणी रुंदीकरण व खोलीकरण, ५४ ठिकाणी तलाव, ओढे या ठिकाणचा गाळ काढण्यामुळे यावर्षाच्या सपूर्ण कामाचा विचार करता तीन हजार ते ३२०० टीसीएम एवढा पाणीसाठा करण्यात यश आले आहे.यावर्षी डाळिंबाव्यतिरिक्त आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे. त्यामुळे फळबाग व भाजीपाल्याचे क्षेत्र २५०० हेक्टरवर गेले आहे, तर जवळपास २२०० हेक्टर ठिबक सिंचन करण्यात यश आले आहे. तालुक्यात शेततळीही मोठ्या प्रमाणात असून, शासनाच्या धोरणानुसार मागेल त्याला शेततळे उपलब्ध होणार आहे. पावसाळ्यानंतर माणमध्ये वेगळे चित्र दिसणार असले तरी सध्याची परिस्थिती तेवढीच भयानक आहे. तालुक्यात दरवर्षी सरासरी ४६५ मि. मी. पाऊस पडतो. यंदा २२३ मि. मी.च पाऊस पडल्याने तालुक्यातील सर्वच १०६ गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आहे. संपूर्ण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी भटकंती करावी लागणाऱ्या मार्डी आणि बिदाल येथील शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले आहेत.