शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

काले प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:45 IST

कऱ्हाड : काले (ता. कऱ्हाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांचा वाद ...

कऱ्हाड : काले (ता. कऱ्हाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांचा वाद ग्रामस्थांना सहन होईना, तर आरोग्य अधिकारी याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. शिपाई, स्वीपर व आरोग्य कर्मचारी यांची रोजची भांडणे, हाणामारी यांना ग्रामस्थ कंटाळले असून, कामातील कामचुकारपणामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. अशा कर्मचाऱ्यांना आळा घाला; अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिला आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या केंद्रातील काही कर्मचारी दवाखान्याच्या पाठीमागील असलेल्या शासकीय सदनिकेत राहतात. मागील आठ दिवसांपासून शिपाई हेमंत पाटील व स्वीपर सविता पाटील, तसेच कर्मचारी नीता भोसले यांची रोजच कडाक्याची भांडणे होत आहेत, तर या भांडणात अश्लील शिवीगाळ होत आहे. त्यांच्या कामात अनियमितता असून, अनेक दिवस कामावर गैरहजर राहूनही हजेरीपत्रकावर सह्या करून ते पगार घेत आहेत. त्यांच्या रोजच्या भांडणांना रुग्ण कंटाळले असून, शेजारी राहणाऱ्या लोकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. हे कर्मचारी दवाखान्यात अधिकारी बनून मिरवत आहेत. त्यांना वैद्यकीय अधिकारी पाठीशी घालत आहेत, याचे नेमके कारण काय? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

आरोग्य केंद्रात बेशिस्त वर्तन करून कर्मचारी तेथील वातावरण दूषित करत आहेत. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णांना सेवा देतानाही त्यांच्याकडून अनेक चुका होत आहेत. याची तक्रार दिल्यानंतर त्यांना समज दिल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात. मात्र, सुधारणा झाल्याचे दिसत नाही. याकडे जिल्हा व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी; अन्यथा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका अधिकाऱ्यांना पत्राद्वारे निवेदन दिले आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

(कोट)

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही दिवसांपासून हा चुकीचा प्रकार सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या वर्तनाला व एकूणच कारभाराला नागरिकांसह रुग्ण कंटाळले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुधारला नाही, तर ग्रामस्थ त्याला टाळे ठोकण्याच्या तयारीत आहेत.

-अलताब मुल्ला, सरपंच काले