सातारा : ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करावी, या मागणीसाठी व्यसनमुक्त संघाचे विलासबाबा जवळ यांनी पोलीस बंदोबस्तात जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. वारकऱ्यांनी पोलिसांच्या कृती विरोधात मेंढ्यात पायी दिंडी काढून निषेध नोंदवला.ज्येष्ठ वारकरी बंडातात्या कऱ्हाडकर हे ठराविक लोकांना घेऊन आळंदीतून पंढरपूरला वारी काढणार होते. आळंदी ते दाखल झाले होते. मात्र मागणी करून देखील वारी साठी शासनाने परवानगी दिली नाही. उलट पोलिसांनी बंड आता त्यांना कऱ्हाड येथील गोशाळेमध्ये स्थानबद्ध केले.याचा निषेध म्हणून व्यसनमुक्ती संघाचे विलास बाबा जवळ व वारकरी संप्रदाय बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता सातारा येथे मोर्चा काढणार होते; याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विलास बाबा जवळ यांना मेढयातूनच ताब्यात घेऊन त्यांना स्थानबद्ध केले. तसेच सातारा येथे वारी बाबत निवेदन द्यायला निघालेल्या अक्षय महाराज भोसले यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेत दहिवडी येथे स्थानबद्ध केले.दरम्यान, जिल्ह्यातील समस्त वारकरी संप्रदाय बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे या मांडून बसला. पायी वारीला परवानगी नाकारणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध, उद्धवा अजब तुझे सरकार अशा घोषणा देत वारकऱ्यांनी हे आंदोलन केले. दरम्यान दोन दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे मार्गदर्शक संभाजी भिडे गुरुजी यांनी मंडळाचा त्यावरील कारवाई रद्द करून त्यांना सोडून द्यावे या मागणीसाठी कराडात मोर्चा काढला होता. बंडातात्या कऱ्हाडकर यांच्या सुटकेसाठी वारकरी अधिकच आक्रमक झाले आहेत.
वारकरी आक्रमक; बंडातात्या यांच्या सुटकेसाठी वारकरी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 13:58 IST
Pandharpur Wari Satara: ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करावी, या मागणीसाठी व्यसनमुक्त संघाचे विलासबाबा जवळ यांनी पोलीस बंदोबस्तात जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. वारकऱ्यांनी पोलिसांच्या कृती विरोधात मेंढ्यात पायी दिंडी काढून निषेध नोंदवला.
वारकरी आक्रमक; बंडातात्या यांच्या सुटकेसाठी वारकरी रस्त्यावर
ठळक मुद्देवारकरी आक्रमक; बंडातात्या यांच्या सुटकेसाठी वारकरी रस्त्यावर पोलिसांच्या बंदोबस्तात विलास बाबांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन