शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी वडगाव हवेली, रेठरेत सत्तांतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 18:00 IST

कऱ्हाड, दि. १७ :  तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींमधील पाडळी हेळगाव, आणे, डेळेवाडी, अंतवडी, किवळ, कासारशिरंबे, रेठरे खुर्द आदी गावांमध्ये सत्तांतर झाले. तर कवठे जुने, कालगाव, पश्चिम सुपने, सुपने आदी गावांतील सत्ता कायम राहिली.कऱ्हाड तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींसाठी सरपंच व सदस्य अशा एकूण ७२३ उमेदवारांसाठी ...

ठळक मुद्देकऱ्हाड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीची मतमोजणी पूर्ण चार गावांची सरपंचपदे रिक्त

कऱ्हाड, दि. १७ :  तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींमधील पाडळी हेळगाव, आणे, डेळेवाडी, अंतवडी, किवळ, कासारशिरंबे, रेठरे खुर्द आदी गावांमध्ये सत्तांतर झाले. तर कवठे जुने, कालगाव, पश्चिम सुपने, सुपने आदी गावांतील सत्ता कायम राहिली.

कऱ्हाड तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींसाठी सरपंच व सदस्य अशा एकूण ७२३ उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी पार पडली. येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात अठरा टेबल व सात फेऱ्यातून पार पडलेल्या मतमोजणीतून अनेक गावांत सत्तांतर तर काही ठिकाणी सत्ता कायम राहिल्याचे स्पष्ट झाले.

सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ झाला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके, युवराज पाटील आदींसह निवडणूक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

चाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या स्थानिक गटात जोरदार लढत झाली.

तालुक्यातील अंधारवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाने आपला सरपंचपदाचा उमेदवार निवडून आणून झेंडा फडकावला. तर आणे ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत स्थापनेपासून सत्ता अबाधित ठेवणाऱ्या  श्रीरंग देसाई गटाचा धुव्वा करीत माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाने आपली सत्ता स्थापन केली.

रेठरे खुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते गटाने सरपंचपद प्राप्त केले. मात्र, विरोधी गटाचे सदस्य याठिकाणी जास्त निवडून आले. किवळ येथे काँग्रेसच्या सुरेखा साळुंखे सरपंच झाल्या.

याठिकाणी माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाने सात जागा जिंकत आमदार बाळासाहेब पाटील गटाला पराभूत केले. गणेशवाडी, कळंत्रेवाडी, वनवासमाची खोडशी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद बिनविरोध झाले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक