शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियाकडून तलाठ्याला मारहाण : खटाव तालुक्यात अवैध वाहतूक , डंपर अंगावर घालण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 21:43 IST

पुसेगाव : महसूल न भरता वाळूची वाहतूक करणारा डंपर अडविल्याच्या कारणावरून कटगुणचे तलाठी किरण पवार यांना मारहाण करण्यात आली. तसेच चालकाने अधिकाºयांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा

पुसेगाव : महसूल न भरता वाळूची वाहतूक करणारा डंपर अडविल्याच्या कारणावरून कटगुणचे तलाठी किरण पवार यांना मारहाण करण्यात आली. तसेच चालकाने अधिकाºयांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सचिन राजगेसह डंपर चालक वलेकर व अज्ञात व्यक्तीविरोधात पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी मंडलाधिकारी व तलाठी यांचे पुसेगाव, बुध, खटाव मंडलामध्ये शुक्रवारी रात्रीपासून गस्त सुरू होती. मंडलाधिकारी विठ्ठल तोडरमल व तलाठी किरण पवार यांनी वर्धनगड बसथांब्यापासून थोड्या अंतरावर शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पुसेगाव बाजूकडून कोरेगावच्या दिशेने जाणारा डंपर (एमएच ११ बीडी ७६) रोखला. चालक वलेकर याच्याकडे वाळूची महसुली पावती व वाहतूक परवान्याची विचारणा केली. त्यावेळी चालक वलेकर याने वाळू पावती व परवाना नसल्याचे सांगितले.

हा प्रकार सुरू असतानाच पाठीमागून काळ्या रंगाच्या कारमधून सचिन राजगे व अंदाजे ४० वर्षांचा एक अनोळखी इसम त्याठिकाणी आला. हा सर्व प्रकार डंपर चालकाने राजगे यास सांगितला. मंडलाधिकारी तोडरमल यांनी ‘वाळूचा डंपर पुसेगाव पोलिस ठाण्यात घ्यावा’, असे चालकाला सांगितले. त्यावेळी ‘घाटात डंपर वळणार नाही, वर्धनगड घाट उतरल्यावर गाडी वळवून घेऊ,’ असे चालकाने सांगितले.

तलाठी किरण पवार यांची कार डंपरच्या मागे तर सचिन राजगे याची कार तलाठी पवार यांच्या गाडीच्या मागे होती. अचानकच डंपर चालकाने कोरेगाव बाजूकडे असलेल्या वीट भट्टीकडे जाणाºया रस्त्यावर वाळूचा डंपर वळविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंडलाधिकारी तोडरमल व तलाठी किरण पवार हे गाडीतून तत्काळ खाली उतरले. त्याचवेळी डंपर चालकाने गाडीतील वाळू खाली केली. गाडी पळून घेऊन जाणार, असे लक्षात येताच मंडलाधिकारी तोडरमल व तलाठी पवार यांनी डंपरच्या समोर उभे राहून त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सचिन राजगे याने ‘सर्वांना गाडी खाली चिरडून टाक,’ असे डंपर चालकाला सांगितले. त्यानुसार चालकाने मंडलाधिकारी व तलाठी यांच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते बाजूला सरले आणि त्या संधीचा फायदा घेत डंपर चालक कोरेगावच्या दिशेने गाडी घेऊन पसार झाला.

सचिन राजगे याने तलाठी किरण पवार यांना डंपरवर का कारवाई करताय याचा जाब विचारत धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी तलाठी किरण पवार यांनी सचिन राजगे, चालक वलेकर व अज्ञात व्यक्तीविरोधात पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करीत आहेत.तहसीलदारांची तातडीने भेट...तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना याबाबतची माहिती कळताच त्यांनी तातडीने पुसेगावला भेट देऊन मंडलाधिकारी व सर्व तलाठी यांच्याकडून झालेल्या घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधितांवर कायदेशीररीत्या गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले.राजगे राजकीय पदाधीकाऱ्याचाच नातलग....वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्न करीत असते. मात्र वाळू माफियांच्याकडून अधिकाºयांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण व धक्काबुक्कीचे प्रकार सुरू असतात. सचिन राजगे हा माणमधील एका राजकीय पदाधिकाºयाचा नातलग असल्याची चर्चा पुसेगाव पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू होती.