शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ बोर्डाकडून जिल्ह्यात नऊ हजार वृक्षांचे रोपण--खुसरो खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:03 IST

सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तान येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शासनाने वक्फ बोर्डाला दिलेल्या तीन लाखांच्या उद्दिष्टातील आजअखेर जवळपास दोन लाख वृक्ष लागवड झाली आहे. तसेच राहिलेल्या एक लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण विभाग काम करत आहे.

ठळक मुद्देलागवडीसाठी कब्रस्तानची निवड; तीन लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट

सातारा : ‘चालू वर्षी शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत वक्फबोर्ड मायनोरिटी विभागाला ३ लाख झाडांचे उद्दिष्ट दिले आहे. यातील सातारा जिल्ह्यात आठ हजार सातशे वृक्षांचे रोपण करण्याचे काम चालू आहे,’ अशी माहिती प्रादेशिक वक्फ अधिकारी पुणे विभागाचे अधिकारी खुसरो खान यांनी दिली.

सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तान येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शासनाने वक्फ बोर्डाला दिलेल्या तीन लाखांच्या उद्दिष्टातील आजअखेर जवळपास दोन लाख वृक्ष लागवड झाली आहे. तसेच राहिलेल्या एक लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण विभाग काम करत आहे.

साताऱ्यातील गेंडामाळ, करंजे आणि सदर बझार येथील कब्रस्तानमध्ये वृक्षारोपण करण्याचे काम सुरू असून, दोन दिवसांत या परिसरात हजाराहून अधिक वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी वक्फची प्रॉपर्टी असलेल्या जागेवर हे वृक्षारोपण करणार असल्याचे खान यांनी सांगितले.

दरम्यान, मागील वीस वर्षांपासून गेंडामाळ कब्रस्तान जागेवर पालिकेने बागेचे केलेल्या आरक्षणाविषयी येथील अ‍ॅक्शन कमिटीने वेळोवेळी दखल घेत हे आरक्षण उठविल्याने खुसरो खान यांनी या कमिटीचे कौतुक केले. तसेच सातारा जिल्ह्यातील मशीद, कब्रस्तान, दर्गाबाबत कागदोपत्री काही अडीअडचणी असल्यास त्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.वृक्ष लागवडीसाठी पुणे विभागाचे हुसेन पठाण, नगरसेवक अल्लाऊद्दीन शेख, अ‍ॅक्शन कमिटी चेअरमन आरिफ शेख, इरफान बागवान व ट्रस्टी आणि सदर बझार येथील सलीम मेमन, सादीक बेपारी, लतिफ चौधरी, रज्जक घोणे, सलीम बेपारी, कमरुद्दीन जमादार आदी नागरिक उपस्थित होते.शासनाचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व कब्रस्तानला भेटी देऊन सर्व्हे करून त्यामध्ये जागा उपलब्ध करून घेतली आहे. त्यामुळे या वृक्ष लागवडीचा नागरिकांबरोबर पर्यावरणालाही लाभ होणार आहे.- खुसरो खान, प्रादेशिक वक्फ अधिकारी, पुणे विभाग पुणेसातारा येथील गेंडामाळ कब्रस्तानमध्ये वक्फ बोर्डाकडून वृक्षारोपण करण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिकforest departmentवनविभाग