शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

टपाल पेटी पत्रांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:40 IST

साताऱ्यातील हेडगेवार चौकात टपाल खात्याने ग्राहकांच्या सोयीसाठी टपालपेटी भिंतीला लावून ठेवली आहे. यामुळे ग्राहकांची सोय होत असल्याने दररोज एखाद-दुसरेच ...

साताऱ्यातील हेडगेवार चौकात टपाल खात्याने ग्राहकांच्या सोयीसाठी टपालपेटी भिंतीला लावून ठेवली आहे. यामुळे ग्राहकांची सोय होत असल्याने दररोज एखाद-दुसरेच पत्र पडत असते. त्यामुळे टपालपेटी इतर वेळी पत्रांच्याच प्रतीक्षेत असते. (छाया : जावेद खान)

२१जावेद०४

००००००००

पिकांसाठी बुजगावणे

सातारा : सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी ज्वारी, बाजरीची पिके जोमात आहेत. या पिकांवर पक्षी हल्ला करीत असल्याने मोठे नुकसान होत असते. यापासून वाचण्यासाठी पिकांच्या राखणीसाठी बुजगावणे उभारले जात आहे.

०००००००

उन्हाच्या तीव्रतेत वाढ

सातारा : साताऱ्यासह ग्रामीण भागात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. दुपारी कडक ऊन पडत आहे, तर रात्री नऊनंतर व पहाटेच्या वेळी गारठा वाढत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे नागरिक त्रस्त होत आहेत. त्यामुळे आजारी पडण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे.

००००००

दवाखान्यात रांगा

सातारा : साताऱ्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन अनेक डॉक्टर रुग्णांची थेट तपासणी करण्याचे टाळून रुग्णांशी संवाद साधूनच माहिती घेत आहेत.

०००००००००

प्रवाशांत संभ्रम

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कोरेगाव ते सातारा मार्गावरील गाड्या काही वेळेस पोवईनाक्यावरून, तर काही वेळेस जिल्हा परिषदेच्या जवळून ये-जा करीत असते. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम होतो. काही वेळेस प्रवाशांना चालत जावे लागते. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

०००००००

आरोग्य तपासणी

सातारा : ‘आम्ही कासवंडकर’ या संकल्पनेतून कासवंड येथे झालेल्या मोफत आरोग्य शिबिरात १०२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यासाठी सामाजिक कार्यकर्ते सखाराम चोरमले यांनी पुढाकार घेतला. यावेळी गरजूंना चिकित्सा करून मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

०००००००

सैदापूरजवळील नवीन रस्त्याची दुरवस्था

सातारा : साताऱ्यातील सैदापूर-वर्येदरम्यान असलेल्या रस्त्याचे काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. काही दिवसांतच रस्ता उखडला असून, खडी बाहेर आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे.

०००००००००

ट्रान्स्फाॅर्मरची तोडफोड

पाचवड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ओझर्डे हद्दीत धोम कालव्यावरील गुप्ता ट्रान्सफॉर्मरची अज्ञातांनी तोडफोड केली. त्यातून ऑइल व तांब्याच्या तारांची चोरी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

०००००००

गांधी मैदानावर वाहने

सातारा : साताऱ्यातील गांधी मैदानावर आजवर चौपाटी भरत होती. त्यामुळे साताऱ्यातील खवय्यांना एकाच जागी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळत होते. मात्र, गांधी मैदानावर आता दिवसभर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे ते एकप्रकारे वाहनतळच बनले आहे, तर खाद्यपदार्थांचे गाडे इतरत्र आहेत.

०००००००

राजवाडाजवळ वडाप

सातारा : साताऱ्यातील राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर मंडईपर्यंत वाहने रस्त्यावर लावण्यास मनाई आहे. दुचाकी वाहने तेथे लावलेली असल्यास वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. मात्र, या मार्गावर वडाप गाड्या एका रांगेत लावलेल्या असतात. त्यांच्यावर कारवाई काय केली जाते, असा प्रश्न पडत आहे.

०००००००००

निधीचे संकलन सुरू

कुडाळ : अयोध्या येथील राममंदिर उभारणीकरिता जावळी तालुक्यात रामनिधी संकलनास सुरुवात झाली असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मेढा येथील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. अविनाश कारंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली निधी संकलन केले जात आहे.

००००००

पाणीसाठ्यात घट

सातारा : जानेवारी सुरू असतानाच ऊन तापायला लागले आहे. पाण्याचे बाष्पीभवन वाढत असल्याने पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे. तरीही अनेक सातारकर पाण्याची नासाडी करीत आहेत.

०००००००००

कास मार्गावर वानरांमुळे अपघातांचा धोका

पेट्री : शहराच्या पश्चिमेस सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटातील रस्त्यावर वानरांचा धुमाकूळ सुरू आहे. एखाद्या वाहनाची वानराला धडक बसून अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तीव्र वळणावर समोरून आलेले वाहन कळत नाही. त्यातच चालकाचे लक्ष वानरांकडे जात असल्याने अपघात घडत आहेत.

००००००

सुरक्षेकडे दुर्लक्ष

सातारा : राज्यभरात आगीमुळे मोठमोठ्या दुर्घटनांची मालिकाच सुरू आहे. यातून जिल्ह्यातील प्रशासनाने, तसेच बहुमजली इमारतींतील रहिवाशांनी धडा घेण्याची गरज आहे. फायर ऑडिट नियमित करून घ्यावे, जेणेकरून दुर्घटना टळेल.

०००००००

पाणी वाया

सातारा : पाचगणी-महाबळेश्वर मार्गावर पाचगणीला येणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. व्हॉल्व्ह खराब झाल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असल्याने परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

०००००००

प्रशासनाच्या आवाहनाला भाविकांचा प्रतिसाद

वाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने मांढरगडावरील काळूबाईची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गडावर येण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली. या निर्णयाचे भाविकांनी स्वागतच केले असून, मांढरगडावकडे जाताना फारसे कोणी दिसत नाही. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी झाला असला तरी पोलीस काळजी घेत आहेत. कोणी जाताना आढळल्यास चौकशी करीत आहेत.

आडवा फोटो : २२ लक्ष्मण गोरे

कोरोना टेस्टसाठी शिक्षकांच्या दवाखान्याबाहेर रांगा

कोरोनामुळे दहा महिन्यांपासून शाळा बंद होत्या; परंतु सध्या कोरोना नियंत्रणात आहे. लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवार, दि. २७ पासून सुरू करण्याचे ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांनुसार बामणोली परिसरातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांनी शुक्रवारी बामणोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन कोरोना टेस्ट करून घेतली.

(छाया : लक्ष्मण गोरे)