शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात येत्या मंगळवारी मतदान यंत्र प्रेत यात्रा

By नितीन काळेल | Updated: January 20, 2024 18:56 IST

सातारा : मतदान यंत्रावर भारतीय जनतेचा विश्वास राहिलेला नाही. यासाठी परिवर्तनवादी संघटनांच्यावतीने मतदान यंत्र हटाव आंदोलन सुरू आहे. साताऱ्यातही ...

सातारा : मतदान यंत्रावर भारतीय जनतेचा विश्वास राहिलेला नाही. यासाठी परिवर्तनवादी संघटनांच्यावतीने मतदान यंत्र हटाव आंदोलन सुरू आहे. साताऱ्यातही मंगळवारी (दि. २३) ईव्हीएम हटाव कृती समितीच्यावतीने मतदान यंत्र प्रेत यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी केले आहे.सातारा येथे आयाेजित पत्रकार परिषदेत माने बोलत होते. ते पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील भानू प्रतापसिंग आणि इतर वकिलांनी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी मतदान यंत्र हॅक करता येते हे सिध्द करुन दाखवलेले आहे. यामुळे भारतीय संविधान, लोकशाही प्रक्रिया, निवडणूक आयोग हे सर्वच निकालात निघाले आहेत. तर कोट्यवधी मतदारांच्या मताची चोरी होत असून ती सर्वांच्या समोर होत आहे. जनतेचा आता मतदान यंत्र मशीनवर विश्वास राहिलेला नाही. कारण, १८ लाख ९४ हजार मशीन गायब आहे. तर १७ लाख ६ हजार मशीन खराब आहेत. या गायब आणि खराब मशीनबाबत निवडणूक आयोगही बोलत नाही. यासाठी पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकांवरच निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी मागणी देशातून होत आहे. आताही साताऱ्यात आंदोलन होत आहे.मंगळवार, दि. २३ जानेवारी रोजी साताऱ्यातील राजवाडा येथून सकाळी १० ला मतदान यंत्र प्रेतयात्रा निघणार आहे. शांततेच्या मार्गाने ही यात्रा जिल्हाधकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी माने यांनी केले.

विविध पक्षांचा पाठिंबा..साताऱ्यात मंगळवारी होणाऱ्या मतदान यंत्र हटाव आंदोलनाला राष्ट्रीय काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, आंबेडकरवादी पक्षांनीही पाठिंबा दिल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEVM Machineएव्हीएम मशीन