शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

वाळूवाले जोमात; प्रशासन कोमात!

By admin | Updated: December 2, 2014 00:48 IST

नियम धाब्यावर : अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात अवैध वाळू वाहतूक जोमाने सुरू असून, सगळे नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक होत असल्यामुळे आणि महसूल यंत्रणा याबाबत गंभीर नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ट्रक आणि ट्रॅक्टरमधून सर्रास दिवसाढवळ्या वाहतूक सुरू असल्यामुळे वाळूवाले जोमात अन् प्रशासन कोमात असं म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.शहरीकरण वेगाने वाढत असल्यामुळे आणि बांधकाम व्यवसायाचा वाळू हा अविभाज्य घटक असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागांत वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या व्यवसायाकडे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण वळू लागले आहेत. त्यातच बाहेरून वाळूची मागणी करून गरजेप्रमाणे पुरवठा केल्यास बक्कळ कमिशन मिळत असल्यामुळे या व्यवसायाकडे बघण्याची तरुणांची मानसिकता बदलली आहे. त्यामुळे अगदी खेड्यापाड्यांत ‘दादां’ची संख्या वाढू लागली आहे.वाळूतस्करी रात्री-अपरात्री केली जाते. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बांधकामाने म्हसवड, कऱ्हाड, फलटण परिसरातील वाळूला मोठी मागणी आहे. त्यामुळे रात्रीवेळी वाळू वाहतूक करणारे ट्रक चालू असतात. खुलेआम सुरू असलेल्या या उद्योगामुळे वाई-वाठार, तडवळे सं., वाघोली-पिंपोडे बुद्रुक रस्त्याची चाळण झाली आहे.पोलीस खात्यासह महसूल विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून याकडे दुर्लक्ष केले जात असून, यामध्ये नजीकच्या काळात व्यावसायिक स्पर्धा निर्माण होऊ शकते.पोलिसांदेखत महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून व्यवसाय सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिक आश्यर्च व्यक्त करीत आहेत. दिवसेंदिवस वाळू व्यवसाय जोमाने सुरू असून, संबंधित प्रशासन मात्र कोमात गेल्यासारखी परिस्थिती पिंपोडे बुद्रुक येथे निर्माण झालेली आहे. (वार्ताहर)उपायोजना करण्याची मागणीफौजदारी गुन्हे दाखल होवून आणि एकावेळी ५० हजार रुपयांचा दंड होऊनही वाळू माफिया आपला व्यवसाय सुरू ठेवतात. पोलिसांच्या नाकावर टिच्चून आणि पोलीस ठाण्यासमोरून वाळू वाहतूक केली जाते.काही वेळा महसूल यंत्रणेच्या भरारी पथकाचा डोळा चुकवून देखील वाळू वाहतूक केली जाते. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही. सततच्या वाहतुकीमुळे पिंपोडे बुद्रुक येथे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.खराब रस्त्यामुळे ग्रामस्थांसह वाहनचालकांना वाहतुकीदरम्यान अनेक अडचणींना सामारे जावे लागत आहे. प्रशासनाने तत्काळ अवैध वाळूवाहतुकीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.पंधरा दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करुन संबंधितांकडून ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सध्या तहसील कार्यालयात ७/१२ संगणकीकरणाचे काम सुरु आहे. असे असले तरी तालुक्यात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांची कसलीच गय केली जाणार नाही. - अर्चना तांबे, तहसीलदारपिंपोडे-बुदु्रक ते तडवळे या रस्त्यावर गेली अनेक दिवस अवजड वाहतूक सुरू आहे. यामुळे हा रस्ता अतिशय खराब झाला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून चारचाकी वाहने तर सोडाच पण सायकल चालविणेदेखील जिकीरीचे झाले आहे. प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करण्याबरोबरच अवडज वाहतुकीवर बंदी आणणे गरजेचे आहे.- सुरेश लेंढे, ग्रामस्थ, पिंपोडे बुद्रुक