शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विवेक वाहिनीचे आता ‘युवा मानस मैत्री’ अभियान : हमीद दाभोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 21:00 IST

सातारा : ‘महाराष्ट्र विवेक वाहिनी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात संपूर्ण राज्यात ‘युवा मानस मैत्री’ अभियान राबविणार आहे. हे अभियान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे,’ अशी माहिती विवेक वाहिनीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.येथील तारांगणमधील डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रात विवेक वाहिनीच्या प्रतिनिधींची दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी ...

सातारा : ‘महाराष्ट्र विवेक वाहिनी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात संपूर्ण राज्यात ‘युवा मानस मैत्री’ अभियान राबविणार आहे. हे अभियान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे,’ अशी माहिती विवेक वाहिनीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिली.

येथील तारांगणमधील डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रात विवेक वाहिनीच्या प्रतिनिधींची दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. त्यावेळी डॉ. हमीद दाभोलकर यांनी ही माहिती दिली. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘बदलती जीवनशैली आणि वाढत्या अपेक्षांमुळे तरुणांमध्ये ताणतणाव आणि इतर मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये १५ ते ३५ वयोगटांतील लोकांचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षी भारतात ५० हजारांपेक्षा अधिक तरुण आत्महत्या करतात. ही गोष्ट देशासाठी खूप गंभीर आहे. त्यामुळे असे विचार मनात येणाºया तरुणाईला योग्य भावनिक आधार देणे ही तातडीची गरज आहे. परंतु असे असताना देशात मानसिक उपचार खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. मानसिक आजारांबाबत लोकांमध्ये जागरुकताही नाही. यासाठीच महाराष्ट्र विवेक वाहिनीने पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र विवेक वाहिनीचे विद्यार्थी युवा मानस मित्र, मैत्रीण म्हणून काम करतील. मानसिक तणावग्रस्त विद्यार्थी ओळखणे त्यांना भावनिक आधार देणे आणि त्यांना योग्य उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्यास प्रवृत्त करणे, ही कामे करतील. त्यासाठी युवा मानसमित्रांना योग्य ते प्रशिक्षणही विवेक वाहिनीकडून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात या कार्यशाळेत करण्यात आली. राज्यभारत पुढील वर्षात एक हजार मानस मित्र, मैत्रिणी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. सोशल मीडियाचाही यासाठी प्रभावी उपयोग केला जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.विवेक वाहिनीच्या या कार्यशाळेत डॉ. शैला दाभोलकर, डॉ. चित्रा दाभोलकर, कुमार मंडपे, देगावचे सरपंच गणेश राठोड, कृष्णात कोरे, उदय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी वाघेश साळुंखे, योगेश जगताप, अजय ढाणे यांनी परिश्रम घेतले...........................................................................................