शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पोटासाठी वानरसेनेकडून पर्यटकांचे मनोरजंन!

By admin | Updated: October 1, 2015 00:29 IST

यवतेश्वर घाटात कसरती : पर्यटक देतात विविध पदार्थांची मेजवानी

पेट्री : सातारा-बामणोली मार्गावरील यवतेश्वर घाटात पर्यटकांच्या स्वागतासाठी नेहमीच सज्ज असणारी वानरसेना आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी पर्यटकांचे मनोरंजन करते आहे. घाटातील ही वानरसेना सकाळी पर्यटकांना गुडमॉर्निंग तर संध्याकाळी गुडइव्हिनींग करण्यासाठी नेहमीच हजर असते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही वानरसेना येथे तळ ठोकून आहे. उन्हाळ्यात धबधबा कोरडा पडल्यावर एकेक थेंब झेलण्यासाठी ही वानरसेना कसरती करताना दिसते. जरी उन्हाळयात पर्यटकांनी या ठिकाणी पाठ फिरवली तरी तिन्ही ऋतूत ही वानरसेना आपले अस्तित्व टिकवून आहे .सातारा-बामणोली मार्गावरील कास पठार, कास तलाव परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. सध्या सुरू असलेला कास पठारावरील फुलोत्सव पाहण्यासाठी हजारो पर्यटक यवतेश्वर घाटातून ये-जा करत असतात. घाटातील कोसळणारा धबधबा व त्यासमोर एका ओळीत बसणारी वानरसेना हे दृश्य मनाला एवढे हेलावून टाकते. धबधब्यानजीक वानरसेनेकडून होणाऱ्या कसरती पर्यटकांना येथे थांबण्यास भाग पाडतात. यावेळी बच्चेकंपनी कुरकुरे, स्नॅक्स, चणे, फुटाणे, पाव, डब्यातील चपाती, मक्याची कणसे, विविध फळे अशा प्रकारची खाद्यपदार्थ वानरांना खायला देतात. सोबत खाऊ नसेल तर बच्चेकंपनी आपल्या आईवडिलांना दुकानातून खाऊ खरेदी करण्यासाठी हट्ट धरतात. उन्हाळ्यातील कडक ऊन, पावसाळयातील जोरदार पाऊस, व हिवाळ्यातील थंडी सहन करत ही वानरसेना यवतेश्वर घाटातून जाणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करते. (वार्ताहर) घाटातील रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. यावेळी वानरसेना व त्यांची पिल्लेदेखील इकडून तिकडे उड्या मारताना दिसतात. अशावेळी वानराचा अपघात होणार नाही, यासाठी कमी वेगाने वाहने चालवावीत. गेल्या दोन महिन्यापूर्वी अशाच भरधाव वाहनाच्या वेगाने एका वानराला जीव गमवावा लागला होता. - विशाल पवार , पर्यटक सातारा वानरसेनाही पर्यटकांची करतेय गंमतवानरांचा फोटो काढण्यासाठी एका पर्यटकाने आपले दुचाकी वाहन धबधब्यानजीक संरक्षक कठड्याशेजारी उभे केले होते. दरम्यान, फोटो काढण्यात मग्न असताना दुचाकीला लागलेली चावी एका वानराने पळविली. प्रयत्न करूनही वानर आपल्या हातातील चावी सोडायला तयार होत नव्हते. त्यावेळी ‘माकडे आणि टोपीवाला’ या कथेचा बोध लक्षात आल्यावर त्या वानरांना खाऊ देताच वानराने चावी जमिनीवर फेकून दिली अन् चालकाच्या जिवात जीव आला.