शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

पाहुणी म्हणून आलेली आई निष्ठुर बनून गेली!

By admin | Updated: July 27, 2016 00:30 IST

मुलाला सोडून पलायन : उंब्रज येथील केळीवाल्या शोभा कांबळे यांनी चौदा दिवस केला सांभाळ

अजय जाधव ल्ल उंब्रज रक्ताची माणसं नाती विसरतात, तेव्हा समाजातील माणसं ती जोडतात. माणुसकी संपत चाललीय अशी ओरड होत असतानाच हे खोटं ठरविणारी घटना उंब्रजमध्ये घडली. पाहुणी म्हणून आलेली आई पोटच्या गोळ्याला सोडून गेली. तेव्हा तिचा शोभा कांबळे यांनी ‘माँ’ बनून सांभाळ केला. याबाबत माहिती अशी की, येथील बाजारपेठेत शोभा कांबळे या अनेक वर्षांपासून केळी विक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवार, दि. १४ रोजी त्या नेहमीप्रमाणे केळी विकत असताना सायंकाळी सातच्या सुमारास भुकेने व्याकूळ झालेली एक महिला दोन वर्षांच्या मुलासह शोभा यांच्याकडे आली. ती स्वत:चं नाव कोमल शिंदे असे सांगत होती. तर मुलाचं नाव यश असल्याचे सांगितले. ‘खूप भूक लागलीय, आम्ही दोघं उपाशी आहोत,’ असे ती म्हणू लागली. शोभा यांना तिचा कळवळा आला. पोराकडे बघितलं तर ते पण हसलं. शोभा यांनी टोपलीतील केळी मायलेकरांना खायला दिली. तेव्हा तिने शोभा यांच्याकडे मदत मागितली. ती म्हणाली, ‘मी गुलबर्गाची. मला कोणच नाही. मला जगण्यासाठी मदत कराल का?’ त्यावर शोभा कांबळे यांनी विश्वास ठेवला. त्यांनी कोमलसह यशला घरी आणले. जेवण केले, यशसाठी खेळणी, कपडे आणली. ही माहिती समजल्यावर शेजारी राहत असलेल्या वैशाली कांबळे तेथे आल्या. त्यांना पाहिल्यानंतर यशने ‘माँ’ म्हणून झेप घेतली. त्या चौदा दिवस यशची आईच बनल्या आहेत. बुधवार, दि. २० जुलैला ती पुन्हा शोभा यांच्या घरी आली. २१ जुलैच्या पहाटे यशला शोभा यांच्या घरात ठेवून कोमल फरार झाली. शोभा आणि वैशाली यांनी यशला लळा लावला. यश तक्षशिलानगरमध्ये बागडू लागला. अनेकजण त्याला माया लावू लागले. पण शोभा यांनीही जास्त वेळ न घालवता पोलिस ठाणे गाठले. त्यावर हवालदार शिवाजी जगताप यांनी घाईत निर्णय न घेता कोमल परत येते का? हे पाहण्याचा निर्णय घेतला. ही घटना सहायक पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांना सांगितली; पण कोमल परत आलीच नाही. अनेक प्रश्न निरुत्तरीत ४काही दिवसांमध्ये हसऱ्या स्वभावाच्या दोन वर्षांच्या यशने सर्वांना आपलेसे केले होते. त्याला बालसुधार गृहात पाठविताना शोभा कांबळे, वैशाली कांबळे, बीट अंमलदार शिवाजी जगताप यांचे डोळे पाणावले होते; पण अनेक प्रश्न निरुत्तरीत राहिले आहे. यश आणि कोमल नक्की कोण आहेत?, कोमल खरोखरच यशची आई होती का? की तिने त्याला पळवून आणले? यासारखे अनेक प्रश्न सतावत आहेत. बालसंगोपन गृहात यश ४प्रेम, माया यापेक्षाही कायदा महत्त्वाचा आहे. खाकीला कायद्यानेच वागावे लागते. उंब्रज पोलिस ठाण्यातील महिला कर्मचारी मंगळवारी यशला घेऊन बालसुधार गृहात गेल्या. त्यांच्यासोबत शोभा आणि वैशाली याही होत्या. तेथून त्याची म्हसवडच्या बालसंगोपन केंद्रात रवानगी करण्यात आली आहे.