शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा बँकेस परदेशी पाहुण्यांची भेट : नेपाळ, बांग्लादेशाच्या सहकारी बँकिंग क्षेत्रातील पदाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:48 IST

सातारा : ग्रामीण अर्थव्यवस्था सबलीकरणासाठी व उभारणीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या अभ्यासाकरिता नेपाळ व बांग्लादेशातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील

सातारा : ग्रामीण अर्थव्यवस्था सबलीकरणासाठी व उभारणीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या अभ्यासाकरिता नेपाळ व बांग्लादेशातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी वैकूंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था, पुणे यांच्यामार्फ त बुधवार, दि. २३ रोजी भेट दिली. बँकेचे संचालक प्रकाश बडेकर व कांचनताई साळुंखे यांनी स्वागत केले़

सहकारी बँकिंग क्षेत्रात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशात नामांकित आहे. या बँकेचे संचालक मंडळाने जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी व कृषी सहकार कार्यान्वित केले आहे. तसेच ग्रामीण भागात विविध कारणांसाठी करत असलेले अर्थसहाय्य याचा अभ्यास व सातारा जिल्हा बँकेच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी ही भेट आयोजित केलेली होती़

अभ्यास भेटीसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांचे स्वागत करताना बँकेचे सरव्यवस्थापक, प्रशासन व वित्त एस. एन. जाधव म्हणाले, ‘बँकेची स्थापना दिगवंत यशवंतराव चव्हाण यांनी केलेली आहे़ यशवंतराव चव्हाण यांचा कृषी विकासाचा संकल्प व कृषी औद्योगिकरणाचा ध्यास बँकेने आपल्या प्रत्येक योजनेत कार्यान्वित केला आहे़. शेतकºयाला केंद्र्रस्थानी ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी बँकेने अनेक महत्त्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविलेल्या आहेत़ बँक आज तळमळीने व निष्ठेने ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली आहे.

विविध प्रकारे बँक सामाजिक बांधिलकी जपत आहे. बँकेच्या ठेवी, कर्ज, वसुली, भाग-भांडवल, लाभांश, एनपीए, स्वयंसहायता बचत गट, प्रशिक्षण केंद्र्र, शेतकरी ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी, किसान क्रेडिट कार्ड, विविध कर्ज योजना, बँकेला उत्कृष्ट कामकाजाबद्दल नाबार्डचे मिळालेले बेस्ट परफॉर्मन्स अ‍ॅवॉर्डस, आयएसओ प्राप्त मानांकन व लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये टॉपर को-आॅपरेटिव्ह बँक म्हणून नोंद झाली आहे. महाराष्ट्र बँक्स असोसिएशनचे उत्कृष्ट कामकाज अ‍ॅवॉर्डस आदींची माहिती दिली. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या निकषांप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे बँक कामकाज करीत आहे.सेवेतील सातत्य व कामकाजातील गुणवत्ता यामुळे देशातील व परदेशातील विविध मान्यवर, बँकिंग व सहकारी क्षेत्रातील संस्थांना रिझर्व्ह बँक, नाबार्ड व देशपातळीवरील महत्त्वपूर्ण आर्थिक संस्था यांच्यामार्फत अभ्यासासाठी निमंत्रित केले जाते़कृषी, सहकाराचा गौरवबँकेसह त्या देशातील व त्या प्रांतातील सहकारी बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करता येतो. तसेच या बँकेची यशस्वीता प्रत्यक्ष भेटीमुळे परदेशी पाहुण्यांना अनुभवता येते़ हा अनुभव व विचारांची देवाण-घेवाण झाल्यामुळे पुढील कामकाजासाठी दिशा प्राप्त होते़ आज ही प्रगल्भता या बँकेस प्राप्त झाल्यामुळे कृषी व सहकाराचा गौरव होत असल्याचे दिसून येते़सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेस नेपाळ, बांग्लादेशातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील पदाधिकाºयांनी भेटी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँक