काँग्रेसतर्फे कोरोना मदत केंद्राचे व्हर्च्युअल उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:33+5:302021-04-13T04:37:33+5:30

सातारा : जिल्हा काँग्रेसच्या ‘कोविड मदत व सहाय्य केंद्राचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व्हर्चुअल उद‌्घाटन झाले. या कोविड ...

Virtual inauguration of Corona Relief Center by Congress | काँग्रेसतर्फे कोरोना मदत केंद्राचे व्हर्च्युअल उद्घाटन

काँग्रेसतर्फे कोरोना मदत केंद्राचे व्हर्च्युअल उद्घाटन

Next

सातारा : जिल्हा काँग्रेसच्या ‘कोविड मदत व सहाय्य केंद्राचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व्हर्चुअल उद‌्घाटन झाले. या कोविड मदत केंद्र सुरू केले असून याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कदम, नरेश देसाई, ॲड. धनावडे, मनोजकुमार तपासे, धनश्रीताई महाडिक, विश्वंभर बाबर, ॲड. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जास्तच भयावह परिस्थिती झाली असल्याकारणाने रुग्णसंख्येत जिल्ह्यात झपाट्याने वाढ होत आहे. या महामारीच्या संकटांवर मात करण्यासाठी काँग्रेस पक्षाने सामाजिक जाणीव व दायित्वाच्या भूमिकेतून जनजागरण करून कोविड रुग्णांना वैद्यकीय मदत व सहायता करण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेसच्यावतीने सातारा येथील मुख्यालयात कोविड मदत व सहाय्य केंद्र सुरू करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, सध्या महाराष्ट्रात कोरोनाची भयावह परिस्थिती आहे, यामुळे कोरून रुग्णांना योग्य उपचार व्हावेत यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्याना जबाबदारी दिली आहे.

कोरोनाविषयी जनजागरण मोहीम सुरू असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘टास्क टीम’शी संपर्क करून आपल्या गावातील, वॉर्डातील तालुक्यातील रुग्णांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

Web Title: Virtual inauguration of Corona Relief Center by Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.