शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

किसन वीर यांच्या पुरस्काराने भरून पावलो- विनायकराव पाटील : पुरस्कार प्रदान कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 22:29 IST

वाई : ‘आबासाहेब वीर हे सृष्टीचा उद्रेक होते. म्हणूनच त्यांच्यासारखी माणसं ना कोणत्या एका गावाची ना कोणत्या एका प्रांताची असतात. जागतिक पातळीवर ज्या-ज्या क्रांत्या झाल्या. त्या क्रांतिकारकांच्या ओळीतील आबासाहेब वीर होते. शेवटचा दिस गोड व्हावा, या भावनेतून जात असताना आबांच्या नावाच्या पुरस्काराचा हात पाठीवर पडल्याने भरून पावलो,’ असे भावोद्गार माजी ...

ठळक मुद्देविविध मान्यवरांची उपस्थिती

वाई : ‘आबासाहेब वीर हे सृष्टीचा उद्रेक होते. म्हणूनच त्यांच्यासारखी माणसं ना कोणत्या एका गावाची ना कोणत्या एका प्रांताची असतात. जागतिक पातळीवर ज्या-ज्या क्रांत्या झाल्या. त्या क्रांतिकारकांच्या ओळीतील आबासाहेब वीर होते. शेवटचा दिस गोड व्हावा, या भावनेतून जात असताना आबांच्या नावाच्या पुरस्काराचा हात पाठीवर पडल्याने भरून पावलो,’ असे भावोद्गार माजी मंत्री, वनाधिपती विनायकराव पाटील यांनी काढले.

किसन वीरनगर, ता. वाई येथे देशभक्त आबासाहेब वीर यांच्या जयंतीनिमित्त किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विनायकराव पाटील यांना ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या हस्ते आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर उर्वरित महाराष्टÑ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांच्या हस्ते सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांना आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, डॉ. नीलिमा भोसले, केतन भोसले, डॉ. सुरुभी भोसले, प्रल्हादराव चव्हाण, अ‍ॅड. जयवंतराव केंजळे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव यांची प्रमुख उपस्थित होती.

माजी मंत्री पाटील म्हणाले, ‘काही लोकं काळाच्या पुढचं पाहतात. त्यामुळे त्याचं महत्त्व त्यावेळी वाटत नसतं. जेट्राफा लागवडीबाबत असो किंवा अगदी विजय तेंडुलकरांच्या नाटकांच्या बाबतीत असो हेच घडलं आहे. तसेच शेती आणि सहकारातील प्रयोगाबाबत आहे. सर्वच प्रयोग काही यशस्वी होत नाहीत म्हणून प्रयोग करणं सोडता कामा नये. किंबहुना अनेक प्रयत्नातून एखादा प्रयत्न यशस्वी होतो म्हणूनच त्याला प्रयोग म्हणतात.

उल्हास पवार म्हणाले, अनेकांनी आपल्या आयुष्याचा होम केला तेव्हा हे स्वातंत्र मिळालंं. स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी झटताना अनेकांनी एकोपा जपला; पण सध्याच्या काळात राजकीय मतभेदांना द्वेषाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. अशा परिस्थितीत मांगल्याचं रुप म्हणजे विनायकराव पाटील आहेत. तर विलासराव शिंदे हे आजच्या काळातील आश्वासक आणि प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेती उद्योगात घेतलेली भरारी थक्क करणारी आहे.संचालक नंदकुमार निकम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. स्नेहल दामले व दत्तात्रय शेवते यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. प्रताप देशमुख यांनी आभार मानले.सातारा जिल्हा चळवळींची प्रयोगशाळासामाजिक, राजकीय चळवळींची प्रयोगशाळा सातारा आहे. संपूर्ण महाराष्टÑात कोणत्याही चळवळीवर साताºयाच्या तपासणीचा शिक्का असावाच लागतो. अशा सातारा जिल्ह्यात खूप मोठी माणसं निर्माण झाली. याच भूमितील यशवंतराव चव्हाण हे माझं आराध्य दैवत तर आबासाहेब वीर यांच्यात अखेरपर्यंत दडलेलं एक खेळकर मूल माझा दोस्त होता. त्यांच्या स्वभावाच्या अनेक वैशिष्ट्यांचा जवळून अनुभव घेता आला. म्हणूनच आबांच्या नावाचा पुरस्कार ‘आनंदाचे डोही’ ही भावना निर्माण करणारं आहे.’,असे गौरवोद्घार माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी काढले.किसन वीरनगर, ता. वाई येथे आबासाहेब वीर यांच्या जयंतीनिमित्ताने विनायकराव पाटील व विलासराव शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उल्हास पवार, प्रतापराव भोसले, मदन भोसले, गजानन बाबर उपस्थित होते.