शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांच्या गावात पन्नास वाचक करणार बारा तास वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 16:11 IST

पुस्तकांच्या गावी भिलार येथेही वाचनध्यास या सलग वाचनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी दिली.

ठळक मुद्देपुस्तकांच्या गावात पन्नास वाचक करणार बारा तास वाचनवाचनध्यास उपक्रम : १५ रोजी आयोजन

पाचगणी (सातारा) : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी, दि. १५ आॅक्टोबर रोजी राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. गेल्या ती वर्षांत या निर्णयाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. याही वर्षी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम योजण्यात आले आहेत.

पुस्तकांच्या गावी भिलार येथेही वाचनध्यास या सलग वाचनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी दिली.वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर, शनिवार दि. १३ व रविवार दि. १४ आॅक्टोबर या दोन दिवसांत राज्यातील एकूण ५० वाचक, आपल्या आवडत्या पुस्तक घरात सुमारे १२ तास पुस्तक-वाचन करणार आहेत.

वाचन कौशल्यांचा विकास आणि वाचनसंस्कृतीचे संवर्धन या दोन्ही उद्दिष्टांना पूरक अशा या उपक्रमास संपूर्ण राज्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. संगणक अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, एस. टी. वाहक अशा विविध प्रकारचे ५० नोंदणीकृत चोखंदळ वाचक सलग वाचनासाठी भिलारला येणार आहेत.या नोंदणीकृत वाचकांची निवासाची व्यवस्था शासनातर्फे करण्यात आली आहे. नोंदणीकृत वाचकांव्यतिरिक्त इतर वाचकही स्वखचार्ने या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. ग्रंथचळवळीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, भाषासंवर्धक श्याम जोशी व मराठीचे अभ्यासक डॉ. प्रकाश परब यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारण्याची संधी दि. १३ आॅक्टोबर रोजी या उपक्रमातील सहभागींना मिळणार आहे.

दि. १४ रोजी सायकाळी ५ वाजता भिलार येथेच पाऊसवेळा हा साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमही योजण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क आहे, अशी माहितीही डॉ. काटीकर यांनी दिली.

टॅग्स :literatureसाहित्यSatara areaसातारा परिसर