शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सातारच्या नगराध्यक्षपदी विजय बडेकर बिनविरोध

By admin | Updated: October 16, 2015 00:05 IST

उपनगराध्यक्षपदी ‘नगरविकास’चे जयवंत भोसले

सातारा : सातारच्या नगराध्यक्षपदी सातारा विकास आघाडीचे विजय बडेकर, तर उपनगराध्यक्षपदी नगर विकास आघाडीचे जयवंत भोसले यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वत: पालिकेत उपस्थित राहून नगराध्यक्ष बडेकर व उपनगराध्यक्ष भोसले यांना संयुक्तपणे एक पुष्पहार घातला. सातारा नगरपालिकेमध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाची सत्ता आहे. सव्वावर्षासाठी दोन्ही आघाड्यांनी पदे वाटून घेतली आहेत. २०१६ रोजी होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीला केवळ सव्वा वर्ष बाकी आहे. तत्पूर्वी या वर्षाचा शेवटचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ ठरल्याप्रमाणे (पान ९ वर)‘साविआ’कडे होता. गेल्या आठवड्यात नगराध्यक्ष सचिन सारस व उपनगराध्यक्षा दीपाली गोडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर पालिकेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. ‘साविआ’कडून नगराध्यक्षपदासाठी विजय बडेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित झाली होती. केवळ त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी होती. मात्र, ‘नविआ’कडून भालचंद्र निकम, जयवंत भोसले, महेश जगताप, दीपलक्ष्मी नाईक हे चारजण उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. शेवटच्या दिवसापर्यंत उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याविषयी ‘सस्पेन्स’ कायम होता. बुधवारी सकाळी अकरा वाजता नगरसेवक जयवंत भोसले यांंनी अर्ज भरल्यानंतरच उपनगराध्यक्षपदी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांना पसंती दिल्याचे स्पष्ट झाले. दुपारी बारापर्यंत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी केलेल्या अर्जाची प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी छाननी केली. त्यानंतर दुपारी दोन वाजता या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट, ‘साविआ’ आणि ‘नविआ’चे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. निवडी जाहीर झाल्यानंतर नूतन नगराध्यक्ष विजय बडेकर व उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांची त्यांच्या समर्थकांनी शहरातून मिरवणूक काढली. (प्रतिनिधी)