शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

शिवगर्जनांनी वंदनगड दुमदुमला!, हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा

By सचिन काकडे | Updated: December 20, 2023 19:03 IST

सातारा : प्रताप गडावरील शिवपराक्रमाला उजाळा देण्यासाठी श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी वंदन गडावर विजयोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात ...

सातारा : प्रतापगडावरील शिवपराक्रमाला उजाळा देण्यासाठी श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी वंदनगडावर विजयोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. फेटेधारी मावळे, पारंपरिक वाद्यांचा गजर, गगणभेदी घोषणा, पालखी सोहळा अन् गुलालाच्या उधळणीत पार पडलेला हा सोहळा हजारो शिवभक्तांनी याची देही याची डोळा अनुभवला.३६४ वर्षांपूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला अफजल खान वधाचा प्रसंग इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविला गेला. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी शिवरायांनी क्षणाचाही उसंत न घेता चंदन-वंदन गडावर भगवा फडकवला आणि हिंदवी स्वराज्याचा ध्वज पन्हाळ्याच्या दिशेने दौडू लागला. या घटनेला उजाळा देण्यासाठी शिवप्रतापदिनाच्या दुसऱ्या दिवशी वाई तालुक्यातील वंदनगडावर श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने विजयोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचे यंदा पाचवे वर्ष आहे.बुधवारी सकाळी सात वाजता वाई तालुक्यातून आलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची तर कोरेगाव तालुक्यातून आलेली छत्रपती संभाजी महाराज यांची पालखी पारंपरिक वाद्याच्या गजरात वंदनगडाकडे मार्गस्थ झाली. वंदनगड पायथा, मरीआई देवी मंदिरामार्गे दोन्ही पालख्यांची सकाळी ११ वाजता भेटीचे पठार येथे भेट घडवून आणण्यात आली. पालखी गडावर मार्गस्थ करताना शिवभक्तांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा गगणभेटी घोषणा देण्यात आल्या. तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी मिलिंद एकबोटे, विक्रम पावसकर, रविराज भोसले, संभाजी भालघरे यांच्यासह राज्यभरातील दहा हजारांहून अधिक शिवभक्तांनी हजेरी लावली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFortगड