शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

विजय दिवस हा अभिमानास्पद समारोह

By admin | Updated: December 16, 2015 00:06 IST

शिवाजीराव देशमुख : कऱ्हाडला ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कार’ प्रदान सोहळा उत्साहात

कऱ्हाड : ‘भारतीय सैन्यदलाच्या बांगला मुक्ती संग्रामातील देदीप्यमान विजयाप्रीत्यर्थ कऱ्हाडला प्रत्येक वर्षी विजय दिवस साजरा केला जातो. संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा हा ‘विजय दिवस’ म्हणून ओळखला जातो. यादिवशी भारतीय सैन्यदलातील तिन्ही दलातील सैनिकांनी देदीप्यमान कामगिरी केली होती, त्याच्याच प्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. कऱ्हाडला साजरा केला जाणार विजय दिवस हा देशातल्या प्रत्येक नागरिकाने साजरा केला पाहिजे,’ असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केले.कऱ्हाड येथे विजय दिवस समारोह समितीच्या वतीने आयोजित ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कार’ प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मर्चंट समूहाचे अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार, शिवाजी विद्यापीठ कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, पद्मश्री चंद्रकांत बोर्डे, मेजर जनरल मुखर्जी, कर्नल संभाजीराव पाटील, पुष्पलता पाटील, नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, गुलाबराव पोळ, मुख्याधिकारी प्रशांत रोडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माजी सभापती शिवाजीराव देशमुख व मर्चंट समूहाचे अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार यांना ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कारा’चे वितरण करण्यात आले. तसेच सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथील शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या आई कालिंदी घोरपडे यांना वीरमाता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.माजी सभापती देशमुख म्हणाले, ‘देशाच्या त्यागासाठी आपले सर्वस्व प्रदान करणे ही साधी गोष्ट नाही. या देशातील तरुणांना पोलीस हा एकच शब्द माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यात सैन्यदलाच्या कार्याबाबत उर्जा निर्माण करणे गरजेचे आहे. आज देशासाठी प्राण देणारे अनेक वीर आहेत. आज माजी सैनिकांसाठी सरकारने कायदे केले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. सैनिकांना सोयी सुविधा देण्यामध्ये महाराष्ट्राचा खूप खाली क्रमांक लागतो.’चंद्रकांत बोर्डे म्हणाले, ‘कऱ्हाडकरांचे मैदान हे शौर्यवीरांचे मैदान आहे. अशा शौर्यवीरांना मी अभिवादन करतो. हा पुरस्कार माझ्या जीवनातील एक महत्वाचा असा पुरस्कार आहे.’यावेळी कर्नल संभाजीराव पाटील व कु लगुरु डॉ. देवानंद शिंदे, गुलाबराव पोळ यांनी मनोगत व्यक्त केले.विजय दिवस समारोह समितीचे सचिव अ‍ॅड. संभाजीराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले.(प्रतिनिधी)