शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

नाना पाटील चौकातील अतिक्रमणं घेताहेत वाहनचालकांचा बळी

By admin | Updated: July 8, 2017 13:27 IST

फलटणकरांतून नाराजी : पोलिस अन पालिका प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका

आॅनलाईन लोकमत फलटण (सातारा), दि. ८ : शहरातील सतत वर्दळीचा आणि मोठा चौक असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकात वाहतुकीचा ताण पडत आहे. या चौकात बुधवारी रात्री एका सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याने हा चौक आणखी किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पालिकेने ठोस भूमीका घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे. फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून चार रस्ते फुटतात. एक पुणे-बारामतीकडे जाणारा. दुसरा पंढरपूरकडे जाणारा. तिसरा दहिवडी-साताराकडे जाणारा तर चौथा शहरात येणारा आहे. चौकात मिळणारे चार रस्ते अन् जवळच असलेले बसस्थानक यामुळे या चौकात चोवीस तास वर्दळ असते. हा परिसर सतत गजबजलेला असतो. या चौकाच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहने ये-जा करत असून परिसरातच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. या चौकाजवळ बँका, शाळा असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. या चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. काही वेळेस तासभर चौकाच्या चारी बाजूने वाहतुकीच्या रांगा लागल्या असतात. चौकात वाहतूक पोलिस असले तरी त्यांचा जास्त वेळ परजिल्ह्यातील वाहने अडवून त्यांच्याकडून पैसे घेण्यातच जात असल्याचा आरोप वाहनचालकांमधून होत आहे.या सर्व गोष्टींचा विचार करता या चौकात सातत्याने अपघातांची मालिका वाढलेली आहे. या चौकात गेल्या दोन वर्षांत शेकडो अपघात झालेले आहे. चौकाला अतिक्रमणाचा विळखा आहे तसाच विळखा खड्ड्यांचाही बसलेला आहे. चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच रस्त्याची लेवल नसल्याने अपघात वाढत आहेत. चौकातच मोठ्या प्रमाणात खासगी वाहतूक करणाऱ्या वडापच्या गाड्या उभ्या असतात. या गाड्यांमुळे काहीवेळेस वाहतुकीस अडथळा येत असूनही वाहतूक पोलिस त्यांना बाजूला सरकविण्याचे धाडस दाखवत नाहीत.चौक परिसरातून नीरा उजवा कालवा वाहत जात असतो. या कालव्याच्या पुलाची रुंदी वाढविणे गरजेचे आहे. या पुलावरही बराचवेळ वाहतूक अडकून पडलेली असते. त्यामुळे पुलाच्या रुंदीकरणाबाबत तसेच रस्त्याच्या मजबुतीकरणाकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.या चौकातील वाहतुकीकडे व सोयीसुविधाबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने कित्येकजणांनी येथे जीव गमवला आहे. पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या देखरेखीवरून एकमेकाकडे बोट दाखवित असले तरी दोघांनी मिळून ज्याच्या त्याच्या हद्दीतील प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. सायकलवरून जाणाऱ्या सायकलस्वारास डंपरखाली पडल्याने नाहक जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. या चौकातच शाळा असून, शाळेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. कित्येक बळी जाऊनही नगरपालिकेचे प्रशासन आंधळेपणाचे सोंग घेऊन गप्प बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे.क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. अनेक अपघात या चौकात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या चौकातील चारही बाजूंने गतिरोधक तयार केले तर वाहनांचा वेग कमी होऊन अपघात कमी होतील. तसेच चौकातील रस्त्यांचे मजबुतीकरण करून साईडपट्ट्या भरल्या तरी अपघात कमी होतील.- राजेंद्र भागवतगोखळी

अपघातांना कारणीभूत घटक

- अतिक्रमणांचा विळखा- चौकात उभे असलेल्या वडाप गाड्या- खड्डे अन् असमतल रस्ते