शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावच्या मतदानात दाटून आला उत्साह!

By admin | Updated: August 4, 2015 23:20 IST

ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत; गुरुवारी मतमोजणी; आता निकालाकडे लक्ष

सातारा : सातारा जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. जिल्हा प्रशासनाकडे रात्री उशीरापर्यंत मतदानाची एकूण आकडेवारी प्राप्त झाली नाही तरीही सरासरी ८४ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. या निवडणुकीत मतदारांचा उदंड उत्साह दिसून आला. मतदाराजाला मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी गावोगावी पॅनेलतर्फे वाहनांची व्यवस्था केली होती. बुधवारी ढगाळ वातावरण होते. पण पावसाने हजेरी लावली नसल्याने मतदारांनी रांगा लावून मतदान केले. अनेक गावांमध्ये आमदार, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, सहकाराच्या राजकारणातील मातब्बर मंडळींनी ठिय्या मारला होता. संवेदनशील गावांमध्ये राजकीय मंडळी विशेष दक्षता घेत होते.खंडाळ्यात ७४८ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंदखंडाळा : खंडाळा तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी आज चुरशीने मतदान झाले. तालुक्यातील ६६५६३ मतदारांपैकी ५७, ८५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खंडाळा तालुक्यात सरासरी ८७ टक्के मतदान झाले असून ७४८ उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद झाले आहे. सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली.खंडाळा तालुक्यात एकूण ५५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ४९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. सकाळपासूनच प्रत्येक गावातून मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. तालुक्यातील ३१, ८७० स्त्रीयांपैकी २७, ६८३ स्त्रीयांनी मतदान केले. तर ३४,६९३ पुरूष मतदारांपैकी ३०, १६९ पुरूषांनी मतदानाचा हक्क बजावला.तालुक्यातील खंडाळा, बावडा, अंदोरी, नायगाव, अहिरे, शिंदेवाडी, विंग, पिंपरे बुद्रुक, कोपर्डे, भादे, पारगाव, सांगवी या गावांमध्ये मोठ्या चुरशीने मतदान झाले. यामध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांपैकी राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मनोज पवार, शिवसेना महिला आघाडी प्रमुख शारदा जाधव, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सुनिती धायगुडे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश शिंदे, महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसे यांसह अनेक दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.४९ ग्रामपंचायतींसाठी सर्वत्र चुरशीने मतदान झाले असले तरी कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. शेवटपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरीकांचाही मोठा प्रतिसाद होता.सर्व मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. तर संवेदनशील गावांमध्ये अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दुपारपर्यंत सर्वच गावांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले त्यामुळे केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी लगबग होती. वयोवृद्ध मतदारांना गाडीवरून आणले जात होते.