शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Satara: पर्यटकांना अनुभवता येणार वासोट्याचा थरार, दुर्गभ्रमंतीसह जलसफारीचाही आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:30 IST

वासोटा किल्ला निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांना कायमच भुरळ घालत असतो

सातारा : राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू अन् जिल्ह्याचे वैभव असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ला शनिवार, दि. १ नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी खुला होत आहे. नैसर्गिक आपत्ती व सुरक्षिततेच्या कारणास्तव हा किल्ला चार महिने पर्यटकांसाठी बंद होता. पावसाच्या उघडिपीनंतर सह्याद्रीतील पर्यटनस्थळे पर्यटनासाठी खुली झाली असून, यामुळे रोजगार व पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे.वासोटा किल्ला निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांना कायमच भुरळ घालत असतो. सुटीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी दिसून येते. घनदाट अरण्य, सदाहरित वृक्षराजी, अथांग जलाशयामुळे या परिसराला एक निराळे वैशिष्ट्य लाभले आहे. किल्ल्यावरून दिसणारे निसर्गाचे रूप विलक्षण ठरते.येथील उंचच उंच कडे अन् प्रचंड खोल दऱ्या मनात धडकी भरवतात. वासोटा पर्यटन सुरू होत असल्याने या भागातील मुनावळे, बामणोली, शेंबडी, तापोळा, अंबवडे येथील बोट व तंबू व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वासोटा सफारीसाठी वनविभाग व बोटक्लबकडून शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.

वासोटा किल्ला व परिसराला समृद्ध जैवविविधता लाभली आहे. हा किल्ला १ नोव्हेंबरपासून पर्यटक व गिर्यारोहकांसाठी खुला होत आहे. या किल्ल्याचे सौंदर्य अबाधित ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे पर्यटक व गिर्यारोहकांनी सुरक्षित पर्यटनाचा आनंद घ्यावा. - विजय बाठे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव बामणोली

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Vasota Fort Reopens for Tourists with Trekking, Boating

Web Summary : Vasota Fort, a major tourist attraction in Satara, reopens November 1st after a four-month closure. This benefits local businesses. The fort offers scenic beauty, attracting nature lovers and trekkers. Boating and trekking fees are set by the forest department.