शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

तरडगावात विसावला वैष्णवांचा मेळा

By admin | Updated: July 19, 2015 00:40 IST

पादुकास्पर्शासाठी रांगा : फलटण तालुक्यात प्रवेश; ठिकठिकाणी अभिषेक

सचिन गायकवाड / तरडगाव चला पंढरिसी जाऊ। रखमादेवीवरा पाहू।। डोळे निवतील कान। माना तेथे समाधान।। अशी अभंगवाणी आळवित मजल-दरमजल करीत आषाढी वारीतील एक-एक टप्पा पार करीत विठ्ठलभेटीच्या आशेने पंढरीला निघालेला वैष्णवांचा मेळा शनिवारी तरडगावच्या संप्रदायिक नगरीत स्वागतानंतर विसावला लोणंद येथील अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी सोहळ्याने शनिवारी खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश केला. तालुक्याच्या सीमेवर स्वागत केल्यानंतर चांदोबाचा लिंब येथे नेत्रदीपक दौड घेत अश्वांनी वारीतील पहिले रिंगण पार केले. त्यानंतर पालखी सोहळा तरगावड बसस्थानक येथे आल्यानंतर सरपंच अतुल गायकवाड, उपसरपंच माधुरी शिंदे, सदस्य व नागरिकांनी जोरदार स्वागत केले. पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेत गावच्या प्रवेशद्वारातून गावात येताच दर्शनासाठी झुंबड उडाली. ग्रामप्रदक्षिणेदरम्यान विठ्ठल मंदिर, मनाळवाडा, चाफळकर वाडा, बापू बुवा मठ या चार ठिकाणी पादुकांचे पूजन व अभिषेक करण्यात आला. यावेळी गेली दोन दिवस वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटणारे हात पादुकांच्या स्पर्शासाठी पुढे सरसावत होते अन् धन्य झालो असे बोल मुखातून बाहेर पडत होते. ग्रामप्रदक्षिणेनंतर तळावर पालखी नेण्यात आली. तेथे समाज आरती झाल्यानंतर एक दिवसाच्या मुक्कामासाठी पालखी सोहळा येथे विसावला. दिंड्यातील वारकरी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले तर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पालखी काळात वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी विविध विभाग, संस्था, तरुण मंडळे तत्परतेने झटताना दिसत होती. ठिकठिकाणी समाजप्रबोधनपर कार्यक्रम झाले.