शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चैत्र महिन्यातच वैशाख वणवा

By admin | Updated: April 20, 2017 22:36 IST

वाईत दोन ठिकाणी घटना : अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग विझविली; वैरणीसह अवजारे, झाडे खाक

वाई/बावधन : कणूर-बावधन, ता. वाई येथील ओढा परिसरात आग लागल्याने शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजी, शेतीची अवजारे, झाडे, बैलगाडी असे साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशमन बंबाच्या तीन गाड्यांच्या मदतीने स्थानिक तरुणांनी अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. सकाळी साडेदहाच्या सुमारास लागलेली आग दुपारी दोनच्या सुमारास विझविण्यात यश आले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कणूर येथील बाबीचा ओढ्यास आग लागल्याने सुमारे दीड किलोमीटर परिसरातील ओढा व बाजूच्या परिसरात ही आग पसरली. ओढ्यानजीकच्या खाशाबा बापू राजपुरे, धर्मू बापू राजपुरे, अंकुश ग्यानबा शिंदे, अशोक कृष्णा राजपुरे या शेतकऱ्यांच्या दोन कडब्यांंच्या गंजी, १२ नारळाची झाडे, ७ आंब्याची झाडे, २५ करंज व लिंबाची झाडे, ६ कळकीची बेटे, १ बैलगाडी, शेती अवजारे, १ विद्युत मोटर, ५२ प्लास्टिक पाईप, २ पाण्याच्या टाक्या, २ ट्रॉली जळण अशी सुमारे ३ लाख रुपयांची हानी या आगीत झाली. सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागल्याचे समजताच कणूरमधील युवक व ग्रामस्थांनी विहिरीवरील मोटर पाईपलाईन, बोअरवेलवरील पाण्याच्या साह्याने आग विझविण्यास सुरुवात केली. धाडसाने काही युवकांनी कडब्याच्या गंजीलगत बांधलेली जणावरे सोडवल्याने ती बचावली. दरम्यान, वाई पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. थोड्याच वेळात किसन वीर साखर कारखान्याचा व पाचगणी नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन ैबंबाच्या साह्याने युवकांनी आग आटोक्यात आणली. आगीची बातमी समजताच सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ, मदन भोसले, नितीन मांढरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, ग्रामपंचायत सदस्य तानाजी कचरे, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलिस निरीक्षक कदम व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंडलाधिकारी एन. एस. भांदीर्गे, तलाठी एस. बी. साबणे यांनी पंचनामा केला. (प्रतिनिधी) आगीत एका म्हशीचा मृत्यू...वाई शहराजवळ यशवंतनगर आहे. येथील सोनजाईदेवी रस्त्यावर दादा सावंत यांचे जनावरांचे छप्पर आहे. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास या छपराला आग लागली. यामध्ये एका म्हशीचा आगीमुळे भाजून मृत्यू झाला. तर यावेळी दावे तोडल्याने बैल वाचला. दरम्यान, डोंगराच्या बाजूला आग लागली होती. ती आग सावंत यांच्या गोठ्यापर्यंत आली. त्यामुळे ही दुर्घटना घडली, असे सांगण्यात येत आहे. गुरुवारी दिवसभरात वाई तालुक्यात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत.