शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नीरा-देवघरचे पाणी महिन्यात वाघोशीत

By admin | Updated: December 22, 2016 23:18 IST

मकरंद पाटील : औद्योगिकीकरणामुळे खंडाळ्याची दुष्काळी म्हणून ओळख पुसली

शिरवळ : ‘खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढीला लागले असून, दुष्काळी तालुका म्हणून असलेली ओळख पुसली गेली आहे. खंडाळ्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन धोम-बलकवडीचे पाणी खंडाळ्याच्या शिवारापर्यंत आल्यांनतर आता महिनाभरात शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न झालेल्या नीरा-देवघरच्या कालव्यांचे काम पूर्ण करत पाणी वाघोशीपर्यंत घेऊन जाणार आहे,’ अशी घोषणा आमदार मकरंद पाटील यांनी केली. सांगवी, ता. खंडाळा येथे विविध विकासकामांच्या व वडगाव पोतनीस याठिकाणी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून नाबार्डच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या वडगाव-पळशी पुलाचे भूमिपूजन व सभामंडप, सोसायटी कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भोर-वेल्ह्याचे आमदार संग्राम थोपटे, खंडाळा पंचायत समिती सभापती नितीन भरगुडे-पाटील, अ‍ॅड. शामराव गाडवे, पंचायत समिती सदस्य रमेश धायगुडे, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र तांबे, शिरवळचे उपसरपंच उदय कबुले, वडगाव सरपंच सोनल खामकर, उपसरपंच पंकज खामकर, राहुल खामकर, आदेश भापकर, अजय भोसले, राजेंद्र नेवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता युवराज देसाई, ठेकेदार नंदकिशोर परदेशी, खंडाळा नगराध्यक्ष शरदकुमार दोशी, उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे, बंटी महांगरे आदी उपस्थित होते. यावेळी पुलाचे, सोसायटी कार्यालयाचे, सभामंडपाचे उद्घाटन आमदार मकरंद पाटील व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आमदार थोपटे, नितीन भरगुडे, सोनल खामकर, पंकज खामकर यांनी मनोगतही व्यक्त केले. संजय खामकर यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल पवार यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष खामकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)