शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

'वाघनखे खोटी, हे आदित्य ठाकरे यांनी सिद्ध करावं'; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आव्हान

By सचिन काकडे | Updated: October 1, 2023 16:24 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनख लंडनमधून भारतात आणले जाणार आहे.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात येत आहेत. या गोष्टीचे कौतुक करायचे सोडून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाघनखे खरी आहेत का, हे आम्हाला विचारण्यापेक्षा आमदार आदित्य ठाकरे यांनी ती खोटी आहेत, हे सिद्ध करून दाखवावं, असे आव्हान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व परिसराची स्वच्छता केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी वाघनखांवर उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत माध्यमांनी विचारताच आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने लंडन येथे असलेली वाघनखे भारतात आणली जाणार आहे. तत्पूर्वीच विरोधकांकडून या विषयाचे राजकारण सुरू करण्यात आले आहे. ही वाघनखे खरी आहेत, हे सिद्ध करा, असं ते म्हणत आहेत. मग आमचेही त्यांना आव्हान आहे की, ही वाघनखे खोटी असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवावं.’

ज्या गोष्टीशी मराठी माणसांची अस्मिता जोडली गेली आहे, त्याचे राजकारण न करता आदित्य ठाकरे यांनी मुंबईत येऊन वाघनखांचं पूजन करावं, दर्शन घ्यावं, असा सल्ला त्यांनी दिला. वाघनखे भारतात आल्यानंतर साताऱ्यातही त्यांची मिरवणूक काढली जाईल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.यावेळी माजी नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेAditya Thackreyआदित्य ठाकरे