शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आल्याला पाणी देण्यासाठी ट्रॅक्टर इंजिनचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 23:04 IST

जयदीप जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क रहिमतपूर : पिके जगवण्यासाठी शेतकरी कशा कल्पना लढवेल, हे सांगता येत नाही. अशाचप्रकारे ...

जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : पिके जगवण्यासाठी शेतकरी कशा कल्पना लढवेल, हे सांगता येत नाही. अशाचप्रकारे कोरेगाव तालुक्यातील साप येथील एका प्रगतशील शेतकऱ्याने लखोपती करणारे आले पीक वाचवण्यासाठी चक्क विहिरीवर ट्रॅक्टर उभा करून पाणी देणे सुरू केले आहे. वीज पुरवठा बंद असल्याने ट्रॅक्टरच्या इंजिनचा मोटार म्हणून वापर कल्पकतेने केला आहे.गेल्या बारा दिवसांपूर्वी रहिमतपूर परिसरात वादळी पाऊस झाल्यामुळे साप येथील अनेक वीज खांब जमीनदोस्त झाले होते. वीज वितरण कंपनीच्या वतीने वीजवाहिन्यांची जोडणी सुरू असली तरी अद्याप काही शिवारातील विंधन विहिरींवरील वीजपुरवठा बंद आहे. त्यामध्येच पुरेसा पाऊसही होत नसल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.उन्हामुळे आणि पोषक वातावरणाअभावी अनेक शेतकºयांचे आले पीक गाभाळलेय. अशी परिस्थिती निर्माण होऊन पिकाला धोका निर्माण होऊ नये म्हणून शेतकरी वेगवेगळ्या कल्पना वापरून पुरेसे पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत.साप येथील एका शेतकºयाने आपल्या विहिरीवर ट्रॅक्टर उभा करून इंजिनचा मोटरप्रमाणे वापर करून विहिरीतील पाणी काढत स्प्रिंकलरच्या माध्यमातून आले पिकाला पाणी देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रॅक्टरच्या माध्यमातून आले पिकाला पाणी देण्याचे काम सुरू आहे.शेजारील शेतकरी हा वेगळा उपाय आवर्जून न्याहाळत असून, संबंधित शेतकºयाने केलेल्या कल्पनेचे कौतुक करत आहेत. हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी विशेषत तरुण प्रयोगशील शेतकरी भेटी देत आहेत. काहीजण या अनोख्या प्रयोगाचे मोबाईलमध्ये चित्रीकरणही करत आहेत. हा प्रयोग करण्याची प्रेरणा घेतात. तसेच प्रयोगशील शेतकºयाचे कौतुक होत आहे.आले उगवणीला फटकासाधारणपणे १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत आले लागवड केली जाते. मात्र, त्यावेळी तापमान सुमारे ३० ते ३५ अंश सेल्सिअस असणे गरजेचे असते. यंदा उन्हाळी पाऊस झाला नाही. तसेच तापमानाने चाळीशी ओलांडल्याने आले लागवडीला पोषक वातावरण नव्हते. अशा परिस्थितीतही अनेकांनी आले लागवड केली. अयोग्य वातावरणात शेतकºयांनी वाढीव तापमानात आले लागवड करून त्याला पाणी दिल्यामुळे ३५ टक्के शेतकºयांच्या आले उगवणीला फटका बसला आहे. तसेच अनेक शेतकºयांचे आले गाभाळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पुन्हा आले लागवडीला सुरुवात केली आहे.महागाईचे बियाणे...जून महिना शेवटच्या टप्प्यावर आला असतानाही अद्याप पेरणी योग्य पुरेसा पाऊस पडला नाही. आकाशात काळ्या ढगांची गर्दी होताना दिसत आहे. मात्र, पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाचशे किलो (एक गाडी) आले सुमारे चाळीस हजार रुपये दर देऊन बियाण्यांसाठी खरेदी केले आहे. एवढ्या महागाईच्या पिकाची लागण केल्यानंतर ते जगवणे गरजेचे बनले आहे. त्यावर उपाय म्हणून हा प्रयोग झाला.