शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

उरमोडी कालव्यातून उद्या पाणी सुटणार !

By admin | Updated: April 7, 2016 23:50 IST

शिवेंद्रसिंहराजे : ९०० हेक्टर ओलिताखाली

सातारा : ‘उरमोडी धरणाच्या डाव्या कालव्यातून उद्या, शनिवारी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा तालुक्यातील सुमारे ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे,’ अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.उरमोडी नदीच्या डाव्या तीरावरील क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी उरमोडी डाव्या प्रवाही कालव्याचे काम करण्यात आले आहे. सातारा डावा कालवा एकूण १५ किलोमीटर लांबीचा असून, काही प्रकल्पग्रस्तांनी विरोध केल्याने कालव्याचे काम रखडले होते. मात्र, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मध्यस्थीने समझोत्यातून कालव्याचे काम मार्गी लागले. दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्या दूरदृष्टीतून कृष्णा नदीच्या उरमोडी या उपनदीवर ९.९६ टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आले होते. त्यानंतर अनेक अडचणींवर मात करून धरणाचे काम २०१० मध्ये पूर्णत्वास नेले. आता धरणामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत आहे. धरणातील पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी डाव्या कालव्याचे काम मार्गी लागले असून, उजव्या कालव्याचे कामही प्रगतिपथावर आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ‘अंबवडे ते वळसे’ला हरितक्रांतीचे वेध !या कालव्यामुळे सातारा तालुक्यातील अंबवडे बु., भोंदवडे, अंबवडे खुर्द, डबेवाडी, जकातवाडी, शहापूर, सोनगाव, शेंद्रे, वळसे, आदी गावांतील सुमारे ९०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. याच कालव्यावर भोंदवडे येथून उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली असून, या योजनेद्वारे अतिरिक्त ९०४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.