शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भादेच्या पियूषची घरात अभ्यास करून यूपीएससीत बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:00 IST

सातारा : वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कायदेपंडित बनण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. त्यासाठी स्वत:ला अभ्यासात झोकूनही दिलं.

स्वप्नील शिंदे।सातारा : वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कायदेपंडित बनण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. त्यासाठी स्वत:ला अभ्यासात झोकूनही दिलं. वकिलीचा अभ्यास करत असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली अन् त्यांनी यशाला गवसणी घातली. खंडाळा तालुक्यातील भादे येथील पियूष साळुंखे यांनी यूपीएससीत केंद्रात ६३ वा तर राज्यात पाचवा क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.मूळचे भादे येथील रहिवासी असलेल्या पियूष साळुंखे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पुणे येथील सेंट विंसेन्ट हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिक अँड टेलिकम्युनिकेशनमधून इंजिनिअरिंग पूर्ण केले. दरम्यान, लहानपणापासून वडिलांप्रमाणे वकील होण्याचे स्वप्न ते पाहत होते. म्हणून एलएलबीचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. वकिलीचे शिक्षण घेत असताना त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.२०१६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. पूर्व परीक्षेत यश मिळाले. मात्र, मुख्य परीक्षेत स्कोर कमी आल्याने अपयश आले. पहिल्या प्रयत्नात अपयशामुळे काही प्रमाणात निराशा आली. दरम्यान, आई-वडील आणि मित्रांनी समजूत काढून पुन्हा जोरात प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर निराशा झटकून पियूष यांनी जिद्दीने अभ्यासाला सुरुवात केली. २०१७ च्या पूर्व, मुख्य परीक्षेत यश मिळवून मुलाखतीपर्यंत मजल मारली. पहिलीच मुलाखत असल्याने काही प्रमाणात दडपण होते. तरी न डगमगता त्याला सामोरे गेले. मुलाखत दिल्यानंतर एलएलबीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देत पुन्हा यूपीएससीचा अभ्यास सुरू केला अन् अपेक्षितपणे लागलेल्या निकालामुळे विश्वास बसत नव्हता की देशात ६३ वा क्रमांक मिळवला.मुलाखतीत दृष्टिकोन पाहिला जातोमुख्य परीक्षेनंतर आयोगातर्फे घेण्यात आलेली मुलाखत केवळ २० मिनिटांची झाली. यावर्षी घेण्यात आलेल्या मुलाखतीत ती सर्वात कमी वेळाची होती. त्यामुळे मुलाखत किती घेतली? हे महत्त्वाचे नाही. तर त्यामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भविष्यातील एक प्रशासकीय अधिकारी म्हणून कशा पद्धतीने देतो, हे महत्त्वाचे असते.लायब्ररी व क्लास न लावता केला अभ्यासपियूष यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना ते लायब्ररी व क्लास न लावता केवळ घरी बसून अभ्यास करीत होते. त्याचदरम्यान, एलएलबी, कॉलेज, जिम जाणे, फिल्म पाहणे व मित्र मंडळींमध्ये वेळही घालवत होते.पदावर रुजू झाल्यानंतर शासनांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे मुख्य धोरण असेल. तसेच त्याची अंमलबजावणी करत असताना प्रशासन पारदर्शकपणे चालवण्यावर भर राहील. जिद्द व चिकाटीच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते.- पियूष साळुंखे