चाफळपासून पाच किलोमीटर अंतरावर नाणेगाव बुद्रुक-कडववाडी हे गाव आहे. सैनिकी परंपरा लाभलेल्या या गावाचे सरपंच नितीन मसुगडे यांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील तरुणांना एकत्रित करीत रक्तदान शिबिर घेऊन अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते. तरुणांनीही या उपक्रमास प्रतिसाद दिला. सरपंच नितीन मसुगडे यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत व यशवंत ब्लड बँक यांच्यावतीने शिबिर आयोजित केले. शिबिरात २५ युवकांनी रक्तदान करून शिवजयंती साजरी केली. शिबिराचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक ए. व्ही. ताटे, मारुती मुसळे, माजी सैनिक प्रकाश मसुगडे, पोलीसपाटील प्रियांका बोगाणे, श्रीकांत चव्हाण, सुभाष साळुंखे, मुख्याध्यापिका वैशाली पाटील, संतोष कवठेकर, सोमनाथ बोगाणे, आदी उपस्थित होते.
रक्तदान करून साजरी केली अनोखी शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:29 IST