शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मणरेषांची सांगलीकरांना अनोखी भेट

By admin | Updated: January 28, 2015 00:55 IST

सत्काराला उपस्थिती : पंधरा वर्षांपूर्वीच्या आठवणींना मिळाला उजाळा

अंजर अथणीकर - सांगली -ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी पंधरा वर्षांपूर्वी सांगलीला दिलेली भेट पहिली आणि अखेरची ठरली. यावेळी सांगलीकरांसाठी त्यांनी दोन व्यंगचित्रे भेट दिली. ती आजही माजी महापौर सुरेश पाटील यांनी जतन करून ठेवली आहेत.  आर. के. लक्ष्मण यांना सांगलीचा नेमगोंडादादा पाटील जनसेवा पुरस्कार देण्याचा निर्णय समितीने घेतल्यानंतर याची माहिती देण्यासाठी समितीचे सदस्य पुण्याला गेले. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी समिती सदस्यांच्या आग्रहास्तव पत्नीसह सांगलीला येण्याचे ठरवले. २८ फेब्रुवारी १९९९ रोजी त्यांचा नेमिनाथ भवनमध्ये जनसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अनेक व्यंगचित्रकारांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सभागृहही तुंडूब भरले होते. समारंभानंतर सांगलीकरांनी त्यांना व्यंगचित्र रेखाटण्याचा आग्रह केला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या ५० वर्षांपासून आपण व्यंगचित्रे रेखाटत असून, या ५० वर्षांत ‘कॉमन मॅन’ तारुण्यातून म्हातारा कसा झाला? याचे दर्शन तुम्हाला घडवतो’ असे सांगून त्यांनी कॉमन मॅनचा तारुण्यपूर्व, तरुणपण, प्रौढपण व वृध्द अशी चार व्यंगचित्रे रेखाटली. केवळ पाचच मिनिटात त्यांनी रेखाटलेल्या चित्राला सांगलीकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. ते दिवसभर सांगलीत होते. सायंकाळी त्यांच्या जेवणाचा बेत आखण्यात आला होता. यावेळी सर्व गोडधोड, मसालेदार पदार्थ टाळून जेवणातील दही-भात त्यांनी आवडीने खाल्ला. हे आपले आवडते जेवण असून, ते चांगले लागल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी सुरेश पाटील यांच्या आईचे आभारही मानले. गणराय आणि कॉमन मॅनत्यांनी सांगलीतील आराध्य दैवत कोणते? असा प्रश्न करून त्यांनी दुसरे व्यंगचित्र रेखाटले. यामध्ये त्यांनी गणपती डोळे मिटून बसला असून, कॉमन मॅन (सामान्य माणूस) मात्र उंदराशी चर्चा करीत असल्याचे दाखवले. कार्यक्रमातील दोन्ही व्यंगचित्रांनी सांगलीकरांची मने जिंकली होती.