शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
2
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
3
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
5
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
6
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
7
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
8
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
9
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
10
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
11
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
12
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
13
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
14
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
15
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
16
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
17
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
18
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
19
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार

बारामतीची चाकरी करणाºयांचा सत्कार हे दुर्दैव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखटाव : ‘माण-खटावच्या स्वाभिमानासाठी आजपर्यंत प्रत्येक आघाडीवर लढत आलो आहे. पाण्याची लढाई तर प्राणपणाने लढलो. शरद पवारांसह अनेक बड्या नेत्यांनी जनतेला फसविले. रामराजे तर पृथ्वीच्या अंतापर्यंत माणला पाणी मिळणार नाही, असे सांगायचे. त्यांच्यामुळेच माण-खटावच्या पाणी योजनांची परवड झाली. आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवून फक्त बारामतीकरांची चाकरी करणाºया रामराजेंचा फटाके ...

लोकमत न्यूज नेटवर्कखटाव : ‘माण-खटावच्या स्वाभिमानासाठी आजपर्यंत प्रत्येक आघाडीवर लढत आलो आहे. पाण्याची लढाई तर प्राणपणाने लढलो. शरद पवारांसह अनेक बड्या नेत्यांनी जनतेला फसविले. रामराजे तर पृथ्वीच्या अंतापर्यंत माणला पाणी मिळणार नाही, असे सांगायचे. त्यांच्यामुळेच माण-खटावच्या पाणी योजनांची परवड झाली. आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवून फक्त बारामतीकरांची चाकरी करणाºया रामराजेंचा फटाके फोडून माणमधे सत्कार होतो, हे मोठे दुर्दैव आहे,’ असा घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी केला.नरवणे, ता. माण येथे उरमोडी उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, तालुकाध्यक्ष अर्जुनतात्या काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, माजी सभापती अतुल जाधव, सिध्दार्थ गुंडगे, विजय धट, नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, रामभाऊ देवकर, अकील काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार गोरे पुढे म्हणाले, ‘पाण्याचे राजकारण करून आजपर्यंत अनेकांनी माण-खटावच्या जनतेच्या भावनांशी खेळ केला. मी राजकारणात येताना दिलेला शब्द पूर्ण करत गेल्या चार वर्षांपासून उरमोडीचे पाणी दोन्ही तालुक्यात आणून दुष्काळी जनतेची सेवा करत आहे. माण-खटावच्या मातीची तहान भागवताना, इथल्या शिवारातून कॅनॉलचे पाणी वाहताना आणि ऊसासह बागायती शेती फुलताना समाधान होत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींनी या दोन्ही तालुक्यात पाण्याचे फक्त राजकारण केले. इथल्या जनतेला आश्वासनांवर झुलवत ठेवत राजकीय स्वार्थ साधला. जनतेला जगूही दिले नाही आणि मरूही दिले नाही. युद्ध फक्त घोषणा करून जिंकता येत नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून लढाई लढावी लागते. दुदैर्वाने पाण्यासाठी अशी लढाई कुणी लढलीच नाही.’मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उरमोडीचे विजबिल भरण्यासाठी सरकारला भाग पाडले. उरमोडीचे पाणी माणमधील गोंदवले, किरकसाल, पळशी, म्हसवड, देवापूर, वाकी अशा अनेक गावांमधे नेले आहे. आता हे पाणी नरवणे भागात आले आहे. पुढे वडजलमधे पाणी न्यायचे आहे. ढाकणी तलावातही पाणी सोडायचे आहे. पुढच्या वर्षी उरमोडीचे पाणी जांभुळणीच्या तलावात नेण्याची व्यवस्था करणार आहे.‘शेतकºयांनी या पाण्याचे महत्त्व जाणून ते जपून वापरावे. शेतात अधिकाधिक ठिबकसिंचन करावे.’ असेही गोरे शेवटी म्हणाले.यावेळी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, उरमोडीचे वाहणारे पाणी पाहून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.लढाई सुरूच राहणार...माण-खटावमधील जनतेने आजपर्यंत खूप संघर्ष केला आहे. आहे त्यात समाधान मानून आपण जगतो. प्रतिकूल परिस्थितीशी लढताना इथली जनता सोशीक बनली आहे. आता मात्र दिलेला शब्द पाळत मी इथल्या काळ्या आईचे ऋण फेडत आहे. यापुढेही निवडणुका होतील, आरोप-प्रत्यारोप होतील. मात्र, माझी पाण्याची लढाई सुरूच राहील.पालकमंत्री बोलघेवडेआमदार गोरे म्हणाले, ‘पालकमंत्री मात्र फक्त बोलघेवडे आहेत. ते एका वर्षात जिहेकटापूर उपसासिंचन योजना पूर्ण करणार होते. पहिल्या वर्षी त्या योजनेला फक्त ७० हजारांचा निधी देणाºयांना आघाडीच्या काळात जिहेकटापूरसाठी मंजूर झालेले १२५ कोटी अद्याप खर्च करता आले नाहीत. आघाडीचे सरकार असते तर जिहेकटापूर योजना मार्गी लावली असती.जयकुमार गोरे उवाचराज्यात सरकार कुणाचेही असो माणमधे फक्त जयकुमारचेच सरकारआजपर्यंत आणि आत्ताही पाणी या फकड्यानेच आणले आहे. आता बारसे घालायला कुणीही यावे.उरमोडीचे पाणी लवकरच ढाकणी तलावात सोडणारमाण तालुक्याच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहचेपर्यंत संघर्ष सुरूच रहाणार