शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
2
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
3
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
4
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
5
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
6
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
8
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे
9
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
10
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
11
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
12
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
13
बाबर आझमची 'मॅचविनिंग' खेळी; शोएब अख्तर, वकार युनिससारख्या दिग्गजांची केली धुलाई
14
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
15
तमिळ सुपरस्टार विशालच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी
16
जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत
17
बदलापुरात पोलीस कॉन्स्टेबल श्रावणी वारिंगेंनी तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी; कारण काय?
18
Gauri Pujan 2025: गौराईला नैवेद्य अर्पण करण्याआधी ताटाखाली काढा पाण्याचे मंडल आणि म्हणा 'हा' मंत्र
19
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
20
Mumbai: पर्यावरणपूरक मूर्तीच्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास परवानगी

गोळेगाव येथील नुकसानग्रस्त पिण्याच्या योजना पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST

वाई : वाईच्या काही भागांत अतिवृष्टीमुळे घरे, जमीन, रस्ते यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन सार्वजनिक सुविधांचेही नुकसान झाले. दुर्गम ...

वाई : वाईच्या काही भागांत अतिवृष्टीमुळे

घरे, जमीन, रस्ते यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन सार्वजनिक सुविधांचेही नुकसान झाले. दुर्गम भागातील बहुतांश गावांना डोंगरातील नैसर्गिक झऱ्यातून पाइपलाइनच्या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा केला जातो.

गोळेगावला क्षेत्र महाबळेश्वरवरून डोंगरातून चारशे मीटर पाइपलाइन करून वर्षभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; परंतु अतिवृष्टीमुळे पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. गोळेगावचे पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन भूस्खलनमध्ये वाहून गेली आहे. ही अडचण दूर करण्यासाठी गोळेगाव-गोळेवाडीचे उपसरपंच जितेंद्र दिलीप गोळे यांनी पंकज जुनंझ्या, पुणे यांना पाइपसाठी विनंती केली होती. गोळेगाव गावच्या पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन पंकज जुनंझ्या यांनी गोळेगाव गावासाठी एक हजार फूट दीड इंची पाइप दिले, तसेच नरेंद्र सिंग मनराल आणि

इंदू नरेंद्र मनराल (सणस) यांच्याकडून गोळेवाडी ज्ञानेश्वरवाडीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रॅव्हिटी लाइनकरिता सव्वा इंची दीडशे मीटर पाइप देण्यात आले. यामध्ये धोम-बलकवडी प्रकल्प विभाग वाई उप इंजिनिअर अरीकर यांचे विशेष सहकार्य मिळाले. गोळेगावमधील सर्व ग्रामस्थांनी पंकज जुनंझ्या, उपसरपंच जितेंद्र गोळे आणि धोम-बलकवडी प्रकल्प विभाग वाई यांचे कौतुक केले.