शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आवास योजनेत सातारा राज्यात दुसरा-पाच हजार कुटुंबांना मिळालं हक्काचं घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:33 IST

आयुष्यात प्रत्येकाला आपलं स्वत:चं घर असावं, असं वाटतं; मात्र आयुष्यभर राब-राब राबूनही अनेकांना हक्काचं घर बांधता येत नाही. कधी आयुष्य सरलं, हेही समजत नाही. अशा अनेकांना आधार मिळालाय तो

ठळक मुद्देलाभार्थ्यांना मिळते दीड लाखाचे अनुदान

दत्ता यादव ।सातारा : आयुष्यात प्रत्येकाला आपलं स्वत:चं घर असावं, असं वाटतं; मात्र आयुष्यभर राब-राब राबूनही अनेकांना हक्काचं घर बांधता येत नाही. कधी आयुष्य सरलं, हेही समजत नाही. अशा अनेकांना आधार मिळालाय तो पंतप्रधान आवास योजनेचा. या माध्यमातून प्रत्येकाला निवारा उपलब्ध करून देता-देता जिल्हा परिषदेचा डीआरडीए विभागाने गोरगरिबांना हक्काचा निवारा मिळवून देण्यात राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

हल्ली घर बांधणं म्हणजे, आवाक्याच्या बाहेरचं आहे. वीट, सिमेंट, वाळू आदी घर बांधणीचे लागणारे साहित्य दिवसेंदिवस महाग होत चालल्याने सर्वसामान्यांना घर बांधणं हे केवळ आता स्वप्नच राहिलं आहे.मात्र, जिल्हा परिषदेच्या डीआरडीए (जिल्हा ग्रामीण विभाग यंत्रणा) विभागाने अनेकांची स्वप्नपूर्तीच नव्हे तर गोरगरिबांना हक्काचं घर उपबल्ध करून दिलं आहे.

जिल्ह्यात वर्षभरात तब्बल ५ हजार ८२८ कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला आहे. १ हजार १०८ घरांचे बांधकाम सुरू असून, ६ हजार ३७२ घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे केवळ एका वर्षात तब्बल दहा हजार कुटुंबांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

पूर्वी इंदिरा आवास योजनेतून १ लाख १० हजार अनुदान मिळत होते. मात्र, या योजनेला प्रधानमंत्री आवास योजना असे नामांतर करण्यात आले. सध्या १ लाख ५० हजार अनुदान घर बांधण्यासाठी शासनाकडून मिळत आहेत.लाभार्थ्याला १ लाख २० हजार थेट अनुदान, रोजगार हमी योजनेतून घरावर काम करणाऱ्या लोकांसाठी १८ हजार आणि स्वच्छ भारत मिशनमधून १२ असे १ लाख ५० हजार अनुदान मिळत आहे. 

आधी पैसे.. नंतर घरपूर्वी घर बांधताना लाभार्थ्याला स्वत: च्या खिशातील पैसे खर्च करून घराचे बांधकाम सुरू करावे लागत होते. परिणामी अनेकांकडे पैसे नसल्यामुळे घर मंजूर होऊनही नाईलाज होत होता. त्यामुळे मंजूर झालेले घर मुदतीअभावी परत जात होते. त्यामुळे प्रशासनाने गोरगरिबांचा विचार करून घराचे काम सुरू करण्यासाठीच पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साहजिकच आता मंजूर झालेली घरे वेळेत पूर्ण होत आहेत.सातारा जिल्ह्याने घरकूल बांधणीमध्ये उद्दिष्ट्य पूर्ण केले असून, राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. अद्याप अनेक ठिकाणी घरांची कामे सुरू असून, लवकरच सातारा जिल्ह्याचा राज्यात पहिला येण्याचा मानस आहे.-नितीन थाडे, प्रकल्प संचालक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgovernment schemeसरकारी योजना