शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

उंब्रजचा फेटेवाला दुबईच्या शिवजयंती महोत्सवात मिरवला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 22:16 IST

अजय जाधव । उंब्रज : कला माणसाला जगायला शिकवते. त्याचपद्धतीने कला सामान्य माणसाला परदेशीही घेऊन जाते. असंच घडलंय येथील ...

अजय जाधव ।उंब्रज : कला माणसाला जगायला शिकवते. त्याचपद्धतीने कला सामान्य माणसाला परदेशीही घेऊन जाते. असंच घडलंय येथील फेटे बांधणाऱ्या युवकाच्या बाबतीत. संदीप सपकाळ या युवकाला फेटे बांधण्याची कला चक्क उंब्रजवरून दुबईला घेऊन गेली आहे. निम्मित होते दुबई येथे होणाºया शिवजयंती उत्सवाचे.कºहाड तालुक्यातील चरेगाव हे संदीप संपत सपकाळ याचे मूळगाव. घरची बेताचीच परिस्थिती. अशा परिस्थितीशी झगडत संदीप बारावी पास झाला. अर्थार्जनासाठी त्याने उंब्रजमध्ये सलून सुरू केले. या व्यवसायाला जोडधंदा म्हणून फेटा बांधण्याची कला त्याने अवगत केली आणि या कलेत तो पारंगतही झाला. फेटे बांधण्याची कला संदीपने खूप मेहनतीने अवगत केलीच. मात्र, त्यातील विविध प्रकार अवगत करून फेटे बांधण्यात स्वत:चे वेगळेपण निर्माण केले. उत्कृष्ट फेटा बांधण्याबरोबरच फेटा वेगाने बांधण्यात तो तरबेज झाला. त्याच्या या कलेची चर्चा होऊ लागली आणि राज्याबाहेरून त्याला फेटे बांधण्यासाठी आमंत्रण येऊ लागले.विविध ठिकाणी फेटे बांधत असताना तेथील लोकांशी त्याच्या ओळखी होऊ लागल्या. पुणे येथे एका लग्नाच्या सोहळ्यात त्याची ओळख दुबईस्थित अतुल माने यांच्याबरोबर झाली. संदीपची कला पाहून अतुल यांनी त्याला दुबईतील शिवजयंतीच्या उत्सवात येण्याचे निमंत्रण दिले. फेटे बांधण्यासाठी आपणास परदेशी बोलवले जाईल, हे स्वप्नातही कधी संदीपने पाहिले नव्हते. त्यामुळे त्याला तो सुखद धक्काच होता. त्याने हे निमंत्रण स्वीकारले.परदेशी जायचे तर पासपोर्ट लागतो आणि पासपोर्ट काढण्यापासून संदीपला तयारी करावी लागली. दुबईस्थित अतुल माने यांनी यासाठी सहकार्य केले आणि २८ फेब्रुवारी रोजी होणाºया दुबई येथील शिवजयंतीच्या उत्सवात भाग घेण्यासाठी संदीपच्या विमानाने उड्डाण घेतले. आणि दुबईत त्याने शेकडो शिवभक्तांना फेटे बांधले.दुबईतील उत्सवस्थळ बनले भगवेमयमूळचे महाराष्ट्रातील असणारे चंद्र्रशेखर जाधव, संतोष मोरे व अतुल माने हे गेल्या तीन वर्षांपासून दुबईत शिवजयंतीच्या उत्सवाचे आयोजन करतात. २८ फेब्रुवारी रोजी या उत्सवात महाराष्ट्रासह भारतातील ४०० दुबईस्थित नागरिकांनी सहभाग घेतला. यातील ३०० जणांना संदीपने फेटे बांधले. पुरुष, महिलांसह ढोलपथक, झांजपथकातील सर्व शिवभक्तांच्या भगव्या फेट्यांमुळे दुबईतील उत्सवस्थळ भगवेमय बनले होते, असे संदीप सांगतो.मी नऊ वर्षांपासून फेटे बांधत आहे. फेटे बांधण्याच्या विशेष कलेमुळे महाराष्ट्रासह छत्तीसगड, पंजाब या राज्यांतही मला बोलविण्यात आले होते. कोल्हापुरी फेटा, राजस्थानी फेटा, पुणेरी फेटा बांधण्यात माझा हातखंडा आहे. सरावामुळे मी एका तासात शंभर फेटे बांधतो.- संदीप सपकाळ, उंब्रज