म्हसवड : एकोणिसाव्या शतकात आपापसातील हेव्यादाव्यातून मराठा साम्राज्यास उतरती कळा लागली होती. त्यातून मराठा साम्राज्याचा अस्त झाला होता. त्याचवेळी इंग्रजांनी हिंदुस्थानात आपला जम बसविण्यास प्रारंभ केला. त्यावेळी इंग्रजांविरुद्ध अनेक उठाव झाले. इंग्रज सत्तेविरुद्ध बंड पुकारून त्यांना शह देणारे आणि फासावर जाणारे पहिले क्रांतिवीर उमाजी नाईक ठरले आहेत’, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय जगताप यांनी व्यक्त केले.
म्हसवड (ता. माण) येथील आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक तरुण मंडळाने आयोजित केलेल्या त्यांच्या जयंती निमित्ताने ते बोलत होते. याप्रसंगी आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन अभय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पृथ्वीराज राजेमाने, भाजप व्यापारी शहराध्यक्ष परेश व्होरा, अध्यक्ष नेताजी चव्हाण, उपाध्यक्ष नितीन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
जगताप म्हणाले, ‘इंग्रजांनी हिंदुस्थानात अत्यंत जुलूम, अत्याचार सुरू केले. इंग्रजी राजवटीविरुद्ध सर्वप्रथम रामोशी समाजाने बंड पुकारले. इंग्रजी राजसत्ता उलथून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या बंडात आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांचे योगदान व नेतृत्व महत्त्वाचे होते. त्यांचे बंड वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील. रामोशी समाजातील तरुण आजच्या घडीला स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वत:च छत्रपती व्हावे.’
यावेळी महाबळेश्वरवाडीचे माजी सरपंच विजय जगताप, बाळासाहेब आटपाडकर, शिरतावचे उपसरपंच किरण खवळे, बाबूराव बोडरे, लहुराज चव्हाण, काकासोा जाधव, खजिनदार करण जाधव, सदस्य रवी जाधव, बयाजी जाधव, गणेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो
१०म्हसवड
म्हसवड : येथे क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना अभय जगताप, सोबत पृथ्वीराज राजेमाने, बाळासाहेब काळेल, विजय जगताप, अध्यक्ष नेताजी चव्हाण, लहुराज जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते. (छाया : सचिन मंगरुळे)
100921\img-20210910-wa0067.jpg
इंग्रजा विरुध्द बंड उभारून देशासाठी फासावर जाणारे पहिले क्रांतिवीर उमाजी नाईक : अभय जगताप