शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

उदयनराजे, भाजपची छुपी युती उघड!साटेलोटे :

By admin | Updated: February 13, 2017 22:57 IST

गोडोली, वनवासवाडी, नागठाणे गटांत परस्परांविरोधातील उमेदवारांचे अर्ज मागे

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सातारा तालुक्यात भारतीय जनता पक्षाशी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने केलेली छुपी युती सोमवारी उघड झाली. जिल्हा परिषदेच्या गोडोली, वनवासवाडी, नागठाणे या गटांत तसेच पंचायत समितीच्या पाटखळ, खेड, वनवासवाडी, शेंद्रे, अतीत, नागठाणे या गणांत भाजप व खासदार उदयनराजे गटाने साटेलोटे केले आहे. सातारा तालुक्यात काँगे्रसने खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीसोबत जाहीर युती केली. मात्र, ही युती करत असताना काँगे्रसचे चिन्ह सातारा तालुक्यातून हद्दपार केले. काँगे्रसचे उमेदवार हे खासदार उदयनराजे भोसले यांनीच निवडले. राष्ट्रवादीचे खासदार असणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचा निकाल लागल्यानंतर सातारा राजधानी विकास आघाडीची घोषणा केली होती. यावेळी घेतलेल्या मेळाव्यात त्यांनी सर्वच पक्षांतील नाराजांना आपल्या आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले. खासदार उदयनराजे भोसले यांची ही आघाडी जिल्हाभर काहूर माजवेल, असे समजले जात होते. मात्र, भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी व काँगे्रस पक्षांतील नाराजांना सामावून घेत या आघाडीला खीळ बसली. खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलणी केली. मात्र, सातारा तालुका वगळता इतर ठिकाणी या प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार उभे करत खासदारांशी युती करणे टाळले. या परिस्थितीत सातारा तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शह देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार हालचाली केल्या. गोडोली, वनवासवाडी, नागठाणे गटांतील भाजपच्या उमेदवारांना उदयनराजेंनी माघार घ्यायला लावली. त्या बदल्यात वनवासवाडी, खेड, पाटखळ, नागठाणे या गणांत उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीने उमेदवार दिलेले नाहीत. अतीत, शेंद्रे या गणांत सातारा विकास आघाडीला पाठिंबा देत भाजपने उमेदवार दिले नाहीत. उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे यांच्यात संघर्ष अटळसाताऱ्यातील बहुचर्चित मनोमिलन तुटल्यानंतर सातारा पालिकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने सत्ता प्रस्थापित केली. हीच खेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्येही सुरू ठेवून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला शह देण्याची व्यूहरचना खासदार उदयनराजे भोसले यांनी आखली आहे. त्यासाठी ते काँगे्रस व भाजपाचीही मदत घेत आहे, हे यातून स्पष्ट होत आहे.