शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: उदयनराजे मुख्यमंत्र्यांना भेटले, शिवरायांच्या पुतळ्यासाठी साताऱ्याला मिळालं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 20:56 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवरायांच्या पूर्णाकृती स्मारकासाठी निधीची मागणी केली. त्यास, तत्वत: मंजूरीही देण्यात आली आहे. 

सातारा/नवी दिल्ली - राज्यानंतर आता दिल्लीच्या राजकारणतही मोठा भूकंप घडली आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नेतृत्व मान्य केलं आहे. स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यासाठी, एकनाथ शिंदे आज दिल्लीत गेले होते. या दिल्ली दौऱ्यात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवरायांच्या पूर्णाकृती स्मारकासाठी निधीची मागणी केली. त्यास, तत्वत: मंजूरीही देण्यात आली आहे. 

मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा ऐतिहासिक नगरीतील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती स्मारकाच्या नुतनीकरणासाठी सातारा नगरपरिषदेने राज्य शासनास सादर केलेल्या १६ कोटी १४ लाख रुपयांच्या प्रस्तावास आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तत्वतः मंजूरी दिल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली. उदयनराजेंनी ट्विटवरुन या भेटीचा फोटोही शेअर केला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे मूळ सातारा जिल्ह्यातीलच असून मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उदयनराजेंची ही पहिलीच भेट आहे. राजधानी दिल्लीत ही भेट झाली. 

उदयनराजेंनी रावसाहेब दानवेंचीही घेतली भेट

शिवप्रभुंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सातारा रेल्वेस्टेशन व सातारा जिल्ह्यातील रेल्वे विभागातील विविध नवीन विकासकामांना व प्रलंबित कामांना लवकरच प्रारंभ होणार. यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केल्याचेही उदयनराजे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन सांगितले.

संजय राऊतांवर उपहासात्मक टिका

आमदारानंतर आता 12 शिवसेना खासदारांचाही गट एकनाथ शिंदे गटात सहभागी होत आहे. राजधानी दिल्लीत आज एकनाथ शिंदेंनी 12 खासदारांची भेट घेतली. शिवसेनेतील बंडाच्या या राजकीय घडामोडीत खासदार संजय राऊत हे केंद्रस्थानी आहेत. कारण, शिवसेना आमदारांनी फुटल्यानंतर भूमिका मांडताना संजय राऊत यांनी लक्ष्य केलं. आता, खासदार उदयनराजे भोसलेंनीही संजय राऊतांवर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. संजय राऊत हे देव आहेत, त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका. माझा दिवस चांगला जाऊ द्या, असे म्हणत उदयनराजेंनी संजय राऊतांवर अप्रत्यक्षपणे उपहासात्मक टिका केली. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेEknath Shindeएकनाथ शिंदे